३ कारवायांमध्ये २५ लाख ५१ हजारांचे मॅफेड्रॉन (एम. डी) व गांजा अंमली पदार्थ जप्त..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकांची धडाकेबाज कारवाई..!पुणे शहर पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा यांच्या सुचनेप्रमाणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने पुणे शहर गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकांनी दि.३१/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व स्टाफ असे विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेले बातमीवरुन लोहगाव वाघोली रोड, संतनगर, पुणे येथे इसम नामे कुमेल महम्मद तांबोळी वय २८ वर्षे, रा-प्लॅट नं ३. सुखकर्ता अपा. गोकुळनगर, धानोरी पुणे याचे ताब्यात एकुण १९,१७,३००/- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये ८३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द विमानतळ पोस्टे गु.र.नं.६७/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच दि.३०/०१/२०२५ रोजी पोलीस अंमलदार अझिम शेख यांना मिळालेले बातमीवरुन आनंदनगर बिबवेवाडी रोड, मार्केटयार्ड येथे इसम नामे सैफन ऊर्फ शफिक इस्माईल शेख, वय ५२ वर्षे, रा.५८० आनंदनगर पुणे याचे ताब्यात एकुण ७,०००/- रु.कि. चा ३५० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द मार्केटयार्ड पोस्टे गु.र.नं.१३/२०२५, एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेचअंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना मिळालेले बातमीवरुन पुणे येथील विमाननगर चौकाकडुन श्रीकृष्ण हॉटेल चौका कडे जाणा-या रोडवर मारुती सुझुकी शो रुम समोर सार्वजनिक रोड, विमाननगर पुणे येथे इसम नामे किरण भाऊसाहेब तुजारे वय २४ वर्षे, रा-श्री बिल्डींग, दुसरा मजला, प्लॅट नं.०६, मराठी शाळे शेजारी, आव्हाळ वाडी, वाघोली पुणे. याचे ताब्यात एकुण ६,२७,०००/- किं. रु.चा ऐवज त्यामध्ये ३० ग्रॅम ३५ निग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करुन त्याचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं.६६/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.१ श्री. गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक१, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदिप शिर्के, अझिम शेख, साहिल शेख, रविंद्र रोकडे, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, आझाद पाटील, योगेश मांढरे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, रेहाना शेख, दयानंद तेलंगे पाटील, विनायक साळवे. दत्ताराम जाधव, ज्ञानेश्वर घोरपडे, योगेश मोहीते, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, नुतन वारे, विपुल गायकवाड यांनी केली आहे.