मोटार सायकल व मोटार पंप चोरीतील परराज्यातील ३ आरोपीतांना सालेकसा डी.बी.पोलीसांनी मुद्देमालसह केली अटक…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

⏩ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक- १४/१०/२०२३ रोजी १७/१५ वा. ते १८/०० वा. दरम्यान पो.स्टे. सालेकसा पोलीस पथक   साखरीटोला परिसरात पेट्रोलिंग करित असतांना आरोपी नामे - मनिष कुमार कमल नारायण वर्मा वय २६ वर्ष रा. आलीवारा (मुसरा) ता. डोंगरगढ जि. राजनांदगांव (छ.ग.) हा महाराष्ट्र पोलीस लोगो असलेला हेल्मेट घालून बिना नंबरची हिरो होंडा सलेंडर प्लस काळया रंगाची पिवळे व सेंदरी पट्टे असलेली मो.सा. भरधाव वेगाने चालवितांनी मिळून आला असता त्याचे ताब्यातील मोटर सायकल  ला लटकविलेल्या पांढ-या पिशवीची पाहनी केली असता त्यात निळया रंगाची महाराष्ट्र पोलीस ची टोपी. मो.सा. क्र. एम.एच. ३५ एन २५०७ लिहीलेले मागील व पुढील क्रमांकाचे नंबर प्लेट मिळुन आली. सदर आरोपी यास याबाबत विचारपुस केली असता त्याने समाधान कारक उत्तर न देता उडवा उडवीचे उत्तर देत असुन सदर आरोपीने महाराष्ट्र पोलीस लोगो असलेले हेल्मेट परिधान करुन चोरी करण्याच्या उद्देशाने वेष पालटुन मिळुन आल्याने व त्याचे जवळ महाराष्ट्र पोलीस टोपी, हेल्मेट व चोरीची मो.सा. किंमती १५,०००/- रु. ची बाळगुन मिळुन आल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवून आरोपी विरुद्ध पो. स्टे. ला अप. क्र. ३७१/ २०२३ कलम १७१ भादवी सहकलम १२२, १२४ मपोका अन्वये नोंद करुन सदर गुन्हयात आरोपीस विश्वासात घेऊन पुन्हा विचारपुस केली असता त्याने सदरची मो.सा. पतंगा चौक, गोंदिया येथुन चोरी केल्याचे सांगितले असुन सदरची मो.सा. चोरी गेलेले बाबत पो. स्टे. गोंदिया ग्रामीण येथे अप क्र. ४१८/२०२३ कलम ३७९ भादवी अन्वये नोंद आहे...... 

⏩ त्याचप्रमाणे दिनांक- १५/०८/२०२३ रोजी फिर्यादी नामे -संजय बुधराम हुकरे रा. शिंदीटोला ता. सालेकसा जि. गोदिया यांचे तक्रारीवरून पो .स्टे. अप क्र. ३७२/ २०२३ कलम ३७९ भादवी अन्वये दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचे तपासात अवघ्या २ तासाचे आत गुन्हातील आरोपी नामे–
१) लक्ष्मणसिंह किसनसिंह चंदेल वय ३५ वर्ष रा. डुंडा पांढरी ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया

२) जिवनलाल पिलजसिंग सबर वय ४९ वर्ष रा. राजनांदगांव (छ.ग.) याचा शोध घेवून त्यांचे ताब्यातून सदर गुन्हयात चोरीस गेलेली गंगोत्री जी.पी. एस. मिनी कंपनीची ०५ हॉर्सपावर चा मोटार पंप व वायर किमती ३.५५०/- रु. चा जप्त करुन ताब्यात घेतला असुन सदर गुन्हयाचा तपास सुरु आहे.

🔸   सदरची कामगिरी  पोलीस अधिक्षक, मा. श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर. उप-विभागिय पोलीस अधिकारी, देवरी, श्री. संकेत देवळेकर, अतिरिक्त कार्यभार उप विभाग आमगांव, श्री. किशोर पर्वते , प्रभारी उप-विभागिय पोलीस अधिकारी, आमगांव यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो . ठाणे सालेकसा पो. नि. बाबासाहेब बोरसे, पोउपनि अजय पाटील, पो.हवा. रामेश्वर राऊत, पो.ना. तेजराम कोरेटी, पो.शि. विकास वेदक, अजय इंगळे, मपोशि आंबाडारे, तुरकर, कोरे,  पो.स्टे. सालेकसा यांनी सदरची कामगिरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट