बिरवाडी येथील 26 वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू नातेवाईकांचा आक्रोश…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :-डॉक्टर महामूणकर यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या बहिणीचा मृत्यू.. नातेवाईकांचा आरोप…
महाड तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वेळा रूग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रूग्ण मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मागील काही महिन्यापूर्वी डॉक्टर नांदगावकर येथे एका लहान मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज महाड तालुक्यातील बिरवाडी मधले आवाड येथील विवाहित महिला विरा वितेश मोरे या आपल्या आईच्या घरी आली असताना सकाळी घरात अचानक चक्कर आल्याने बिरवाडी येथे प्रथम उपचार करून महाड येथील प्रसिद्ध डॉ. महामूनकर यांच्या आदित्य नर्सिंग होम येथे अधिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.
विरा मोरे या महिलेला छातीत दुखत असल्यामुळे श्वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली असता वीरा मोरे हिच्यावर डॉक्टर महामुनकर या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सदरच्या महिलेचा मृत्यू झाला असे घटनास्थळी असलेले नातेवाईक यांनी आरोप केले आहेत.
तर मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि डॉ महामुनकर यांच्यांत शाब्दिक चकमक देखील झाली. माझ्या बहिणीला डॉक्टर महामूनकर यांनीच मारले असे आरोप नातेवाईक करीत असल्याचे पहायला मिळाले.
नातेवाईकांचा उद्रेक पाहिल्याने घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी नातेवाईकांना शांत केले व पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत व्यक्ती विरा मोरे यांना नातेवाईकांच्या ताब्यांत दिले असता सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदना करीता पाठविण्यात आला असून महाड पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

सदरचा मृत्यू डॉक्टरांच्या
हलगर्जीपणामुळे झाला असून संबंधित खाजगी हॉस्पिटल वर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे सदर घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com