मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील २६ नागरिकांचे हरविलेले / गहाळ मोबाईल सायबर गुन्हे कक्षाकडून परत करण्यात यश..

प्रतिनिधी-अक्षय कांबळे
मि.भा.व.विरार:
मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखा अंतर्गत सायबर गुन्हे कक्ष कार्यरत आहे. मिरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोबाईल हरविलेले / गहाळ मोबाईल संदर्भात आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे येथे ऑनलाईन तक्रारी दाखल करीत असतात.
हरविलेले/गहाळ मोबाईलबाबत ऑनलाईन CEIR (Central Equipment Identity Register) या पोर्टलवर प्राप्त तक्रारींचा सविस्तर विश्लेषण करुन सायबर गुन्हे कक्ष यांनी कारवाई करणेबाबत मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अविनाश अंबूरे यांनी आदेशित केले आहे.
सायबर गुन्हे कक्षाकडून हरविलेले / गहाळ मोबाईलबाबत कौशल्यपुर्ण तांत्रिक तपास, विश्लेषण व पाठपुरावा करून २६ नागरिकांचे मोबाईल परत मिळविलेले आहेत. त्याची एकत्रित अंदाजित रक्कम ४ लाख रुपये आहे.
दिनांक ०८ सप्टेंबर २०२३ रोजी श्री. अविनाश अंबूरे मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांचे हस्ते २६ नागरिकांचे हरविलेले / गहाळ मोबाईल नागरिकांना परत करण्यात आलेले आहे.
उपस्थित नागरिकांना खालील विषयांवर देखील माहिती देण्यात आली.
१. भारत सरकार व दुरसंचार विभाग (Department of Telecommunication) यांच्या संयुक्त विदयमाने नागरीकांकरीता CEIR (Central Equipment Identity Register) ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. बनावट मोबाईल फोन यास आळा घालणे, मोबाईल फोनची चोरी कमी करणे, हरविलेल्या मोबाईलचा गैरवापर टाळणे तसेच कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तो लवकरात लवकर शोधून परत मिळविण्याकरीता सदर प्रणाली उपयोगी आहे. तसेच सायबर गुन्हे विषयक खालीलप्रमाणे माहिती उपस्थित नागरि
२. सद्यस्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे (Trending Cyber Crimes.)
३. सायबर संदर्भात घडणारे गुन्हे (Social Media Related crimes)
४. ऑनलाईन सायबर गुन्हयास कश्याप्रकारे टाळता येईल याबाबतची माहिती (Precautions to be Taken.)
५. ऑनलाईन गुन्हयास बळी पडल्यास तात्काळ कोठे व कश्याप्रकारे तक्रार नोंदवावी याची माहिती
(Where and How to complaint.)
यावेळी नागरिकांनी सायबर गुन्हे कक्ष येथील सेल्फी स्टैंड सोबत सेल्फीस Selfies काढलेल्या आहेत.

सदरची कामगिरी मा.श्री. मधूकर पाण्डेय, पोलीस आयुक्त – मि. भा.व.वि., मा. श्री. श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त – मि. भा.व. वि., मा. श्री. अविनाश अंबूरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मि. भा.व. वि., मा. श्री. अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे कक्षाचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उप निरीक्षक प्रसाद शेनोळकर, स.फौ.संतोष चव्हाण, पो.अं. प्रविण आव्हाड, गणेश इलग, कुणाल सावळे, प्रशांत बोरकर, म. सु. ब. प्रविण सावंत, म. सु.ब. राजेश भरकडे, म. सु. ब. विजय खोत, म. सु. ब. आकाश बोरसे, महिला म. सु. ब. सोनाली मोरे यांनी पार पाडलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com