शॉपची बनावट चावी तयार करुन शॉपमधुन कॅश व मोबाईल चोरी करणा-या आरोपीतास डोंबिवली पोलीसांनी अटक करुन त्याचेकडुन एकुण:- २५,०००/- रुपये किंमतीचा केला मुद्देमाल हस्तगत..

उपसंपादक – रणजित मस्के
डोंबिवली :- दिनांक :- २२/०६/२०२३ रोजी रात्रौ ११:३० वा. ते दिनांक २३/०६/२०२३ रोजी सकाळी ०८:०० वा. दरम्यान फिर्यादी हे काम करत असलेले नथिंग बट चिकन शॉप मध्ये, रंगोली बार समोर, चाररस्ता, डोंबिवली पूर्व येथे कोणीतरी अज्ञात चोरटयाने बंद शॉपच्या शटरच्या लॉकची बनावट चावीच्या सहायाने शटर उपन स्थावाटे आत प्रवेश करून कांउटरचे ड्राव्हरमधील १८०००/- रुपये रोख रक्कम व १०,००० /- रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल असे चोरी केले म्हणून डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा नोंद क नोंद करण्यात आला.. २२६ / २०२३ कलम :- ४५७,३८० भादवि प्रमाणे गुन्हा
नमुद गुन्हयाचा तपासा दरम्यान सपोनि सानप, पो हवा- १३०७/ सरनाईक, पोअ ८४१३ / सांगळे यांनी नमुद गुन्हयाचे घटनास्थळाचे आजुबाजुच्या सीसीटीकीची पाहणी केली असता त्यामध्ये एक संशयीत व्यक्ती त्या परीसरातुन तोंड बाधुन जात असताना मिळुन आल्याने त्याबाबत फिर्यादीस दाखवुन त्याने सीसीटीव्ही मधील इसम हा त्यांचे दुकानात यापूर्वी काम करणारा संशयीत विकास बबटे असल्याचे खात्रीशीर सांगीतल्याने, सदर आरोपीताचे सीसीटीव्ही व तांत्रिक मदतीने सदर आरोपीत हा दावडी सोनारपाडा, डोंबिवली पूर्व परीसरातून ताब्यात घेवुन त्यांचेकडे नमुद गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याचेकडे नमुद गुन्हयातील चोरी केलेला मोबाईल व कॅश असे एकुण २५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपीतांचे नाव व पत्ता:-
विकास नाना बरबटे ३५वर्षे राह रूम नं:- २०३. गोविंद विहार बिल्डींग बि, विंग रिजेन्सी रोड, दावडी डोंबिवली पूर्व सदर आरोपीतावर झालेल्या कर्जामुळे व त्यास नोकरीवरुन काढुन टाकल्यामुळे त्याचा बदला घेण्याकरीता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण श्री दत्तात्रय शिंदे गो. मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ, कल्याण श्री. सचिन गुंजाळ सो मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन सांडभोर, यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा ५०३/ विशाल वाघ, पोहवा १३०७/ प्रशांत सरनाईक, पो.अ ८४१३/नितीन सांगळे, पो.शि./ ३४०६ राठोड यांनी कामगिरी केली आहे..
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com