२४ तासाच्या आत वायफळे येथील खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपी पुणे येथून ताब्यात..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :

तासगांव पोलीस ठाणे हद्दीतील वायफळे गावात सराईत गुन्हेगार विशाल सज्जन फाळके व त्याचे अनोळखी पाच ते सहा साथीदार यांनी वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके, वय – २४ वर्षे, रा. वायफळे, तासगांव याचा जुन्या भांडण्याचा व कोर्टातील केस माघे घेत नसल्याचा राग मनात धरुन कोयता व तलवारीने शरीरावर वार करुन, त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला तसेच विशाल फाळके व त्यांचे साथीदार यांनी संयुक्तरित्या मिळून संजय दामु फाळके, जयश्री फाळके, अशिष साठे, अदित्य साठे व सिकंदर शिकलगार यांचे शरीरावर कोयत्या व तलावारीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत संजय दामू फाळके यांनी विशाल सज्जन फाळके व त्याचे साथीदार यांचे विरुध्द तक्रार दिली असून, त्याबाबत तासगांव पोलीस ठाणेत गुरनं ५५९/२०२४ भा.न्या.सं.क १०३ (१), १०९ (१),१८९ (२), १९१(२), आर्म अॅक्ट क. ४,२५,२७ अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. श्री. सचिन थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगांव विभाग तासगांव यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून, सतिश शिंदे, पोनि, स्थागुशा, सांगली व पोनि, सोमनाथ वाघ तासगांव पोलीस ठाणे यांना मार्गदर्शन करुन यातील मुख्य आरोपीस ताब्यात घेवून इतर आरोपींची नावे निष्पन्न करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सांगली गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व तासगांव पोलीस ठाणेचे संयुक्तीक पथके आरोपीच्या शोधा कामी रवाना केली होती.

सदर गुन्ह्यातील मुख्य सराईत गुन्हेगार विशाल सज्जन फाळके हा गेल्या बऱ्याच कालावधी पासुन पुणे येथे राहणेस असल्याने व त्याचे गुन्ह्यातील साथीदार पुणे येथील असले बाबत माहिती मिळाल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या वेगवेगळ्या तीन टीम तयार करुन त्यांना तपास कामी पुणे परिसरात पाठविले होते. तांत्रीक माहिती, गोपनीय बातमीदार तसेच पुणे शहर गुन्हे शाखा यांची मदत घेवून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल फाळके याची माहिती काढून त्यास पुणे येथे ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्या बाबत आरोपी याचे कडे प्राथमिक तपास केला असता त्याने व त्याचे पुण्यातील साथीदार यांनी मिळून मयतासोबत असणाऱ्या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन त्याचा खून केला असल्याची कबुली दिली आहे.

सदरची कारवाई ही सपोनि पंकज पवार, नितीन सांवत, पोउपनि, कुमार पाटील, नेम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांचे पथकाने केली आहे.

सदर कामगिरी ही मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर, मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. श्री. सचिन थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगांव विभाग तासांव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोनि सतिश शिंदे, पोनि सोमनाथ वाध, तासगांव पोलीस ठाणे, स्थागुशा कडील सपोनि, पंकज पवार, नितीन सावंत, सिकंदर वर्धन, संदीप शिंदे, पोउपनि कुमार पाटील, अमंलदार, सपोफौ अनिल ऐनापुरे, पोहेको उदय सांळुखे, अमोल ऐदाळे, अमोल लोहार, अतुल माने, दरीबा बंडगर, सतीश माने, नागेश खरात, अनिल कोळेकर, प्रकाश पाटील, अनंत कुंडाळकर, मपोहेका दुर्गा कुमरे, पोना सोमनाथ गुंडे, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, पोशि सुनिल जाधव, सोमनाथ पंतगे, सुमित सुर्यवंशी, विनायक सुतार, ऋतुराज होळकर, विक्रम खोत, अभिजीत माळकर, ऋषीकेश सदामते, तसेच तासगांव पोलीस ठाणे कडील पोउपनि राजु अन्नछत्रे, अमोल सुर्यवंशी, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, यांनी केली आहे.

सदर गुन्ह्यातील सराईत आरोपी विशाल सज्जन फाळके यास वरील पथकाने २४ तासाच्या जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील इतर आरोपींची नावे निष्पन्न करुन उर्वरीत आरोपींना ताब्यात घेण्या बाबत तपास पथके कार्यरत असुन लवकरच उर्वरीत आरोपींना ताब्यात घेत आहोत.

या गुन्ह्यातील इतर जखमीवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदरची प्रेसनोट आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध होण्यास विनंती आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *