२६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिन शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात साजरा….

पुणे :
सह संपादक- रणजित मस्के शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पुणे येथे दि. २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन, समारंभ साजरा करण्यात आला. मा.ना.श्री. अजित पवार, उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, पुणे जिल्हा यांनी सकाळी ०९/१५ वा. ध्वजवंदन केले. सदर वेळी श्री. जितेंद्र डूडी (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, पुणे व श्री. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त, पुणे तसेच मा. पोलीस आयुक्त. पुणे शहर श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे श्री. अरविंद चावरिया, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. मनोज पाटील मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम, प्रादेशिक विभाग, पुणे, श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण श्री. पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय, पुणे शहर, श्री. संदीप भाजीभाकरे यांचेसह पोलीस आयुक्तालय, पुणे येथील विभागीय व परिमंडळीय अधिकारी तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार, शासकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, विविध क्षेत्रातील इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे वेळी येरवडा मध्यवर्ती कारागृहा विभाग पुणे येथील अधिकारी व कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय सेवेबद्दल मिळालेले राष्ट्रपतीचे सुधार पदक मा.ना.श्री. अजित पवार, उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनामध्ये परेड कमांडर म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण श्री. सत्यसाई कार्तिक व सेकंड इन कमांडर म्हणुन राखीव पोलीस निरीक्षक, मुख्यालय, पुणे. श्री. दशरथ हाटकर यांचेसह राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१ व २. पुणे यांचेकडील एकुण ०२ प्लाटून, पुणे शहर पोलीस दल पुरूष व एक महिला प्लाटून, पिंपरी-चिंचवड पोलीस दल, पुणे ग्रामीण पोलीस दल, पुणे लोहमार्ग पोलीस दल, पुणे शहर वाहतुक नियंत्रण शाखा, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिलांचे एक प्लाटून, वन विभाग पथकाचे पुरूष व महिलांचे एक प्लाटून, शाळेय विद्यार्थ्याचे चार प्लॉटून, करागृह विभागाचे एक प्लॉटून, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांचे एक प्लॉटून, पुणे शहर, पोलीस वाद्यवृंद पथक, वाहतुक शाखेकडील मोटार सायकल रायडर, गुन्हे शोधक पथकाचे श्वान पथक, जलद प्रतिसाद वाहन पथक, वरूण वॉटर वाहन पथक, अग्नीशामक वाहन दल, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळ बालभारती शैक्षणिक संदेश देणारा चित्ररथ असे सर्व मिळुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संचलनामध्ये सहभाग घेतला होता.शाळेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व देशाप्रती कर्तव्य निष्ठेची शिकवण देणारी तसेच भविष्यात भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण घेणारी छात्रसेनेचे पथक (१) इन्यान्युएल मारथोमा स्कुलच्या (मुली) २) इन्यान्युएल मारथोमा स्कुलचे (मुले) ३) भारती विद्याभवन स्कुल पुणे, केंद्रिय विद्यालय गणेशखिंड औंध पुणे. न्यु इंग्लिश स्कुल ससाणेनगर येथील मुलां-मुलींचे शानदार या पथकांनी संचलन केले नंतर विविध शाळेतील मुलां-मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम झाले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलिस उप निरीक्षक सुप्रिया पंढरकर व रिटा. सहा. पोलीस फौजदार श्री. सिताराम नरके यांनी केले.