२७ दिवसांत २०३३ गुन्हे प्रकरणाची निर्गती.. नव विक्रम ,डीसीपी सचिन गोरे यांना पोलीस आयुक्तकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि २१ ठाणे

उल्हासनगर पोलीस उपायुक्त परिमंडल ०४ मध्ये असलेले हजारो प्रलंबित प्रकरणे अवघ्या २७ दिवसात निकाली काढून पोलिसांनी न्याय प्रक्रियेला नवे बळ दिले आहे. उल्हासनगर परिमंडल चार अंतर्गत राबविण्यात आलेले जुने निर्गती विशेष अभियान मोहिमेत ठाणे पोलीस आयुक्तालय मध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केले असून या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व बद्दल परिमंडळ ४चे पोलीस उपयुक्त सचिन गोरे यांचा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. ही कामगिरी पोलिसांच्या कार्यक्षमता नियोजन शक्ती आणि जनतेचा न्यायचा आश्वासनाचा ठोस पुरावा ठरली आहे. दि ४/०६/२०२५ ते ३० जून २०२५ या उद्या 27 दिवसाचा कालावधीत गुन्हेरगती या विशेष महिन्यात अंतर्गत परिमंडल चार मध्ये एकूण २,०३३ प्रलंबित प्रकरणाची निर्गती करण्यात आली यात १,८०५ विविध गुन्हे, १८० अकस्मात मृत्यू आणि इतर चौकशी प्रकरणे या सर्वांचे समावेश आहे. पोलीस उपयुक्त परिमंडळ ०४ त्यांच्या अंतर्गत असलेले उल्हासनगर अंबरनाथ मध्यवर्ती हेडलाईन बदलापूर विठ्ठलवाडी या सर्व पोलीस ठाण्यामध्ये विशेष निर्गती पथकाचे स्थापना करून अत्यंत नियोजिबद्ध आणि कार्यपद्धतीने ही कामगिरी पार पाडण्यात आली.डीसीपी सचिन गोरे यांनी सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,अधिकारी आणि कर्मचारी वर्गांना एकत्रित करून नियोजन व मार्गदर्शन त्या जोरावर मोहिमेचे अंमलबजावणी केली.
प्रतिक्रिया :-
सचिन गोरे ( पोलीस उपायुक्त, उल्हासनगर परिमंडळ ४ )
“ही प्रशस्ती ही माझ्या वैयक्तिक यशाची नाही, तर परिमंडळ ४ मधील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याच्या आणि कर्मचाऱ्याच्या कठोर मेहनतीचं फळ आहे. ‘गुन्हे निर्गती’ मोहिमेचा उद्देश केवळ आकडे सुधारणे नव्हता, तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे हा होता. ठाणे पोलीस आयुक्तांकडून मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. पुढेही अशाच तडफदार आणि लोकाभिमुख कामगिरीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. गुन्हेगारी नियंत्रण आणि न्यायप्रक्रियेला गती देणे हे आमचं सर्वोच्च उद्दिष्ट राहील.”