22 वर्षीय बेलदार समाजातील तरुणाची दगडाने ठेचून / त्याला जाळून आरोपी फरार…
उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:– महाड शहर पोलीसांनी चार आरोपीस ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे त्याचा कसून तपास पोलीस करीत आहेत.
महाड येथील वहुर गावात बांधकामावर काम करणाऱ्या कामगाराचे नाव लखन बाबाराव चव्हाण असे आहे.
वहूर मध्ये एका खाजगी जागेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू होते. या ठिकाणी काम करणारे कामगार समोर असलेल्या इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी राहत होते.
सोमवारी पहाटेला त्यांच्यामध्ये झालेल्या वादात लखन बाबाराव चव्हाण याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली .
मयत व्यक्तीला या इमारती मधून बाहेर खेचत आणून समोरील नाल्यात टाकून जाळून टाकण्यात आले आहे.
मयत व्यक्ती व आरोपी हे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी असून ते बेलदार समाजाचे असल्याची माहिती मिळाली आहे.
मयत व्यक्तीच्या सोबत असलेल्या काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलिस करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com