सन २००२ पासुन स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील खुनातील हवा असलेला आरोपी अखेर युनिट-३ च्या ताब्यात..

उपसंपादक-उमेद सुतार
पुणे :-सन 2002 मध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत खून, 2007 साली दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुहेरी खून, व त्यानंतर सन 2022 मध्ये सिंहगड पोलीस ठाणे हद्दीत खून करणाऱ्या अजित रामचंद्र पोळेकर या खुनाच्या गुन्हयामधील पाहिजे आरोपीस युनिट 3 कडून अटक करण्यात आली आहे.

आज दिनांक 06/11/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट तीन कडील अधिकारी स पो नि ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 419/2022 भादवि कलम 302 मधील आरोपी नामे अजित रामचंद्र पोळेकर ,वय 40 वर्ष, राहणार दांडेकर पूल , पुणे मूळ राहणार गडदावणे तालुका मुळशी जिल्हा पुणे हा पौड, मुळशी येथे आहे.. त्याप्रमाणे तेथे जाऊन तेथील परिसरात माहिती घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे. व पुढील तपास कामी सिंहगड रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे..
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, मा. श्री. शैलेश बलकवडे सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा.श्री. निखिल पिंगळे सो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, मा.श्री. गणेश इंगळे सो, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि रंगराव पवार, सपोनि ज्ञानेश्वर ढवळे , पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, विनोद जाधव, हरिष गायकवाड, पोहवा शरद वाकसे यांनी केली आहे..
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com