२० वर्षापासून दरोड्यातील पाहिजे असलेल्या आरोपीच्या वाणगावपोलीसानी आवळल्या मुसक्या

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर ;

सन २००५ मध्ये वाणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ४९/२००५ भा.द.वि.से कलम ३९५, ३९७ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यात १० ते १२ अनोळखी इसम यांनी फिर्यादी यांचे वसई अंबातपाडा येथे असलेल्या कार्यालयात घुसून फिर्यादी यास कोयते, सुरे व चाकूचा धाक दाखवून हात पाय बांधुन ४३,०००/- रुपये रोख रक्कम, मोबाईल, एअर रायफल, पिस्तोल तसेच इतर मुद्देमाल दरोडा घालून नेला म्हणून गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे देऊ जाण्या चिमाडा, रा. रुदाना, दादरा नगर हवेली हा पाहिजे आरोपी सुमारे २० वर्षापासून फरार होता.

दि.०४/०३/२०२५ रोजी वाणगाव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि/तुषार पाचपुते यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाल्याने पोहवा/अरूण राऊत, पोहया/संतोष धांगडा, पोहवा/प्रकाश भरभरे यांचे पथकाने नमूद पाहिजे आरोपी देऊ जाण्या चिमाडा, रा. रुदाना, दादरा नगर हवेली यास खानवेल, दादरा नगर हवेली येथून ताब्यात घेवून अटक केलेली आहे.

सदरची कारवाई श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि/तुषार पाचपुते, प्रभारी अधिकारी वाणगाव पोलीस ठाणे पोहवा/अरूण राऊत, पोहवा/संतोष धांगडा, पोहवा/प्रकाश भरभरे नेमणुक वाणगाव पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट