२ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणारा मोक्का गुन्ह्यामधील फरारी आरोपीस चंदननगर पोलीसांनी केले जेरबंद

सह संपादक – रणजित मस्के
पुणे

दि.१०/१०/२०२३ रोजी रात्रौ ०१/२५ वा. चे सुमा कॅफे बुध्दाज चायनिज हॉटेलचे समोर, जुना मुंढवा रोडवर वडगावशेरी पुणे येथे यातील फिर्यादी हे उमे असताना आरोपी नामे शुमम भोसले, वय २७ वर्षे, रा. बंडगार्डन, पुणे याचे सोबत ४ ते ६ अनोळखी इसम त्यांचे कडील दुचाकी गाडीवर येवून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादी यांना मारणेसाठी अंगावर धावून आले. त्यावेळी फिर्यादी हे जीव वाचवण्यासाठी आंबेडकर वसाहतीचे दिशेने धावले असता त्या सर्वांनी मागे येवून वसाहतीच्या बाहेर लावलेल्या दुचाकी तसेच तिनचाकी चारचाकी गाड्यांच्या काचा फोडुन नुकसान करून जोरजोरात आरडाओरडा केला असता वसाहतीमधील लोक जमा झाले असता आरोपींनी त्यांचेजवळील धारधार शखे व लाकडी दांडके हवेत फिरवुन दहशत निर्माण केल्याने सदर ठिकाणी जमा झालेले लोक घाबरुन पळुन गेले म्हणुन चंदननगर पोलीस स्टेशन गु.रजि. नं.४७०/२०२३ भा.दं.वि. कलम १४३,१४४,१४७,१४८,१४९,५०४,५०६, ४२७, क्रि.लॉ.अॅ. कलम ३.७ आर्म अॅक्ट ४ (२५), म.पो. अॅक्ट कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा करणेत आला होता.
सदर गुन्ह्यामधील पाहीजे आरोपी नामे निशांत उर्फ मोन्या रमेश भालेराव, वय-२० वर्ष, रा. दयासागर सोसायटी, गणेशनगर, वडगावशेरी, पुणे हा सुमारे २ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देत होता. सदरचा पाहीजे आरोपी हा मातोश्री सोसायटी समोरील मोकळ्या जागेत, नागपाल रोड, खराडी, पुणे येथे आला असल्याची गोपनीय माहिती पोलीस अमंलदार विश्वनाथ गोणे यांना मिळाल्याने पोलीस उप निरीक्षक असवले, पोलीस अमंलदार विश्वनाथ गोणे, रामचंद्र गुरव, विकास कदम, शेखर शिंदे यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता, बातमीप्रमाणे एकजण तेथे थांबलेला दिसुन आला. त्याने पोलीसांना पाहताच तो पळुन जाऊ लागाला, पोलीसांनी त्यास पाठलाग करुन पकडुन त्यास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव निशांत उर्फ मोन्या रमेश भालेराव, वय २० वर्ष, रा. दयासागर सोसायटी, गणेशनगर, वडगावशेरी, पुणे असे असल्याचे सांगितले
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे, श्रीमती सीमा ढाकणे, पोलीस उप निरीक्षक अजय असवले, पोलीस अमंलदार विश्वनाथ गोणे, रामचंद्र गुख, विकास कदम, शेखर शिंदे यांनी केली आहे.