२ सराईत गुन्हेगार जेरबंद २ घरफोडीचे व ३ मोटर सायकल चोरीचे गुन्हे स्था. गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी केले उघड..

सह संपादक -रणजित मस्के
अमरावती

आरोपींचे नाव पत्ता
१) अक्षय शंकर बागडे वय ३० वर्ष
२) बॉबी गणेश गौरखेडे वय २७ वर्ष दोन्ही रा. सिल्लोरी, नागपुर
मा. श्री. विशाल आनंद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांनी मागील काळात झालेल्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा. पथकांना मार्गदर्शन करुण जास्तीत जास्त मालमत्तेसंबंधी गुन्हे उघडकिस आणनेबाबत आदेशीत केले आहे.
त्या अनुषंगाने दि. ३०/०६/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या गोपनिय खबरेवरुण अक्षय शंकर बागडे व बांबी गणेश गोरखेडे दोन्ही रा. सिल्लोरी, नागपुर यांना विनानंबरच्या दोन मोटर सायकलसह मोशी येथुन ताब्यात घेवून त्यांना मोटर सायकल बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर दोन्ही गाडया त्यांच्याच असल्याचे सांगून कोणतेही कागदपत्र सादर न करता उडवाउडवीचे उत्तरे दिली. सदर मोटर सायकली चोरीच्या असल्याचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेवून विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी दोघांनी मिळून मागील काही काळात ०३ मोटर सायकल चोरीचे व ०२ घरफोडोचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनी दिलेल्या कबुलीवरुण खालील प्रमाणे एकुण ०५ गुन्हे उघडकिस आले
१) पो.स्टे. मोशी अप.क्र.३००/२५ कलम ३०५ (अ),३३१ (४) भा.न्या.सं. (घरफोडी संबधी)
२) पो.स्टे. तिवसा अप.क्र.३१६/२५ कलम ३०५ (अ) भा.न्या.सं. (घरफोडी संबधी)
३) पो.स्टे. मानकापुर, नागपुर शहर अप क्र. २९३/२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं.
(हिरो स्पेल्डंर मोटर सायकल क्र. MH 49 BF 9296 चोरी संबधाने)
४) पो.स्टे. गिट्टी खदान, नागपुर शहर अप क्र. ४१८/२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं.
(हिरो स्पेल्डर प्रो मोटर सायकल क्र. MH 19 BY 4615 चोरी संबधाने)
) पो.स्टे. गिटटी खदान, नागपुर शहर अप.क्र.३९८/२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. ५
(हिरो स्पेल्डंर मोटर सायकल क्र. MH 31 EH 3458 चोरी संबधाने)
दोन्ही आरोपींकडून वरील गुन्हयात चोरलेल्या ०३ मोटर सायकल कि. अं.१,४०,००० रु व चोरीतील नगदी २६१० रुपये असा एकुण १४२.६१० रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना पुढील तपासकामी पो स्टे मोशी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. दोन्ही आरोपी यांचेवर विविध पोलिस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल असून दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.
सदरची कार्यवाही मा.श्री. विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती रा., मा. श्री. पंकज कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. किरण वानखडे यांचे नेतृत्यात त सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाटे, शांताराम सोनोने चालक निलेश आवंडकर यानी केली.