२ खुनांच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीस फलटण शहर पोलीस ठाणे यांनी केले जेरबंद

0
Spread the love

फलटण शहर पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री शंकर पाटील यांनी वरीष्टांचे मागदर्शनाखाली व सहकारी अधिकारी अमलदार यांचेशी विनीमय करून फरारी आरोपींना पकडण्याची मोहीम आखली आहे.

फलटण शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३२५/२०२० भादवि ३०२, ३०७. २०१, ४५२. १४३, १४७, १४८, १४९, १८८, आर्म अॅक्ट ४ २५. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (बी) या गुन्ह्यातील आरोपी नामे रोशन अविनाश ऊर्फ अॅडीसन भोसले रा. इंदीरानगर झोपडपट्टी अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर हल्ली रा. कापशी ता. फलटण जि. सातारा हा दिनांक २७/४/२०२३ रोजी सातारा सेशन कोर्ट येथे येणार असलेबाबत पोनि श्री शंकर पाटील याना त्यांचे बातमीदार यांचेमार्फत बातमी मिळाल्याने त्यांनी वरिष्टांचे मागदर्शनाखाली सदर आरोपीस पकडण्याची योजना आखली व त्याची अंमलबजावणी करणेकामी पैरवी अधिकारी सपोफो संजय पाटील सातारा सेशन कोर्ट, सपोफी सतोष कदम, पोहवा चंद्रकांत घापते, पोकों. काकासोटा कर्णे यांचे पथक पोउनि श्री सुरज शिंदे यांचे अधिपत्याखाली तयार करुन त्यांना सातारा येथे रवाना केले. दिनांक २७/४/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजताचे सुमारास आरोपी रोशन अविनाश भोसले हा वरील नमुद पथकास सातारा सेशन कोर्ट ते आर.टी.ओ. ऑफिस सातारा येथे रस्त्याने जाताना दिल्याने सदर आरोपीस नमुद पथकातील अधिकारी अंमलदार यांनी शिताफीने पकडुन ताब्यात घेतला. त्यानंतर त्यास फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले व त्याचेकडे कसून व त्यास विश्वासात घेऊन तपास केला असता सदरचा आरोपी हा फलटण शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ११७/२०१९ भादवि. ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९ मध्ये गुन्हा घडलेपासुन फरारी • आहे असे लक्षात आले. आरोपीस गुरनं ३२५/२०२० या गुन्ह्यात अटक केली असुन तपास सपोनि श्री नितीन केणेकर हे करीत आहेत त्यांनी सदर आरोपीस श्रीमती ढवळे कोर्ट प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी फलटण न्यायालय येथे हजर ठेवले असता हुजुर कोर्टाने आरोपीची दिनांक ३/५/२०२३ रोजी पर्यंत पोलीस अभिरक्षा मंजुर केलेली आहे.

सदर कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक सोळा, सातारा श्री. समीर शेख मा. अपर पोलीस अधीक्षक सोध, सातारा श्री. बापू बागर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोश, फलटण भाग श्री. तानाजी बरडे यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शंकर पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन केणेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री सुरज शिंदे, सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष कदम, पो. हवालदार चंद्रकांत धापते, पो. नाईक नितीन भोसले, पो. कॉन्स्टेबल काकासो कर्णे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *