२ विधीसंघर्षीत बालकांकडुन घरफोडीचा गुन्हा उघड ९०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिन्यासह मुद्देमाल जप्त..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :–
दि. ०९/१२/२०२४ रोजी रात्रौ २३.०० वा. ते दि.१०/१२/२०२४ रोजी सकाळी ०९/०० वा. चे दरम्यान श्री. बळवंत तांबे यांचे गल्ली नं. ६० तळजाई वसाहत पुणे येथील राहते घराचा दरवाजा कशाचे तरी सहाय्याने उघडुन घरात प्रवेश करुन घराचे कपार्ट उचकटुन कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले त्या बाबत अज्ञात इसमाविरूध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.४३५/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३३१ (३). ३३१ (४) ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक २४/१२/२०२४ रोजी सदर दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पालीस निरीक्षक छगन कापसे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे तपास करित्त असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना त्यांच्या बामतीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्हा हा तळजाई वसाहतीमधील रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालकांनी केला असुन ते तळजाई वसाहतीमधील बदाम चौकाचे अलीकडे एका रिक्षामध्ये बसलेले असुन त्यांचेकडे सोन्याचे दागीने आहेत. त्यांना ताब्यात घेवुन त्याच्या कडे पालकांन समक्ष सदर गुन्हयाच्या अनुशंगाने तपास केला असता सदर विधीसंधर्षीत बालकांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन चोरीस गेलेला दागिने असा एकुण ९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री प्रविणकुमार पाटील सो, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सो।, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटयड, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर सुतकर, खंदु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com