सोलापुरात टेंभुर्णी येथे पोलिसांकडून 2 लाख 63 हजारांचा गांजा जप्त…

प्रतिनिधी- शुभम काळे
सोलापुर :– टेंभुर्णी शहरात करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व टेंभुर्णी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने टेंभुर्णी शहरात धाड टाकून गांजा व इतर साहित्य असा एकूण 2 लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.8) करण्यात आली.

मध्यप्रदेशातील तीन गांजा तस्कर गोंदिया पोलिसांच्या जाळ्यात
टेंभुर्णी शहरात पोलिसांनी धाड टाकून गांजा पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.टेंभुर्णी शहरात अवैध व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे या घटनेवरून स्पष्ट होत असून पोलिसांनी हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. याबाबत पोसई हनुमंत झुंबर वाघमारे (वय-३४) यांच्या फिर्यादीवरून एपीआय गिरीष जोग यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोसई अजित मोरे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com