२लाख ४७ हजारची अवैद्य ७०० लिटर गावठी दारू टेंम्पोसह हडपसर पोलीसांनी केली जप्त…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

हडपसर :-आगामी काळात पुणे शहरात गणेशोत्सव साजरा होत असून त्या अनुषंगाने अवैध धंदे /वाहतुक यांचेवर परिणामकारक कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तपासपथक अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबावत सूचना दिल्या होत्या.

वरिष्ठांनी दिलेले आदेश / सूचनांप्रमाणे दिनांक ०४/०७/२०२२ हडपसर तपास पथकातीत अंमलदार श्रीकांत पांडुळे, भगवान हंबर्डे, चंद्रकांत रेजितवाड असे पहाटे च्या सुमारास पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त करीत असताना, पोलीस अंमलदार श्रीकांत पांडुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की, मारूती कॅरीअर वाहन क्रमांक एम-एच-१२-एस-एक्स ७४३९ या वाहनातुन अवैध दारूची वाहतुक होत आहे.

मिळालेल्या बातमीच्या आधारे रात्रगस्त अधिकारी उमेश रोकडे, सहा पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार श्रीकांत पांडुळे, भगवान हंचडे, चंद्रकांत रेजितवाड यांनी १५ नंबर चौक येथे सापळा रचून सदरची गाडी आडवून त्यातील इसमांना अटकावून ठेवून त्यांना त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) राहुल दामोदर बनसोडे वय ४२ वर्ष रा. काळुराम मंदीराजवळ, सिद्राम मळा, लोणीकाळभोर २) सोमनाथ पोपट कांबळे व २२ वर्ष रा. सदर असे असल्याचे सांगीतले. त्यांच्या मारूती कॅरीअर या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये १९ प्लॅस्टीकचे हत्ती कैन्ड त्यामध्ये अंदाजे ७०० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. गुन्ह्याचे कामी टॅम्पो व गावठी दारू असा किं.स २,४७,५००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाचत हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं १३९८/२०२४ प्रमाणे महाराष्ट्र प्रोव्हीबिशन अॅक्ट कलम ६५ (अ), ६५(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक दिपक कांबळे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त सो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. आर राजा, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, पोलीस अंमलदार, दिपक कांबळे, समीर पांडुळे, भगवान हंबर्ड, चंद्रकांत रेजितवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट