सोन्याचे दागिणे व रोख रक्कमेची चोरी करण्याकरीता वृध्द महिलांचे खून करणाऱ्या २ इसमांना स्थागुन्हे शाखेने केले अवघ्या ७२ तासात जेरबंद…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- २० डिसेंबर २०२३ रोजीचे रात्री ८.०० ते २१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०७.०० वा.चे दरम्यान मोजे पर्वती ता. माण जि. सातारा गावचे हद्दीत राहत असलेल्या १) श्रीमती नंदाबाई भिकू आटपाडकर वय ५८ वर्ष २) श्रीमती संपताबाई लक्ष्मण नरळे वय ७५ वर्ष यांचा कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांचे अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने मोबाईल, व रोख रक्कम जबरीने चोरुन नेहण्याकरीता दोघींचा गळा आवळुन खून केला म्हणून वगैरे मजकुरचे दिले फिर्यादीवरुन म्हसवड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९०/२०२३ भादविस कलम ३०२,३९७,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना ही अतिशय गंभीर असल्याने श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती औचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग दहिवडी, पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सपोनि शिवाजीराव विभुते म्हसवड पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. श्री समोर शेख, पोलोस अधीक्षक सातारा तसेच श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या, त्याप्रमाणे त्यांनी सपोनि रविंद्र भोरे स्वागुशा, पोठनि विश्वास शिंगाडे स्थागुशा, पोउनि पतंग पाटील स्थागुशा सातारा व सपोनि शिवाजीराव विभुते, महसवड पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली तपास पथके तयार करुन तपास पथकास गुन्हा उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या.
पर्यती ता. माण जि. सातारा हे गाव सातारा व सोलापूर जिल्ह्याचे हदीवर असून, ते दुर्गम अश ठिकाणी म्हसवड शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात जाण्याकरीता कच्चा रस्ता असुन, आजुबाजुच्या गावात लोकवस्ती अत्यंत विरळ स्वरुपात आहे. तपास पथकाने गुन्हा घडलेपासुन घटनास्थळावर हजर राहुन सर्वप्रथम आजुबाजुचे साक्षिदार यांचेकडे विचारपुस करुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु घडले प्रकाराबाबत काही एक माहिती मिजून येत नव्हतो. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास पथक सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. दि.२४/१२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे विश्वसणीय गोपणीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, परराज्यातील असणारा रहिवासी व सध्या पर्यती ता. माण जि. सातारा गावात राहणारा जे.सी.बी. चालक व त्याचा साथीदार असे दोघांनी मिळून सोन्याचे दागिणे व पेशासाठी नमुद दोन महिलांचा खून केला आहे.

सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास पथांना नमुद इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या, नमुद तपास पथकांनी पर्यती ता. माण गावचे परिसरात य आजूबाजूचे परिसरात प्राप्त माहितीतील इसांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे नमूद गुन्ह्याचे अनुशंगाने सखोल व कौशल्यपूर्ण विचारपुस केली असता त्यांनी सदचा गुन्हा सोन्याचे दागिणे व पैसे मिळवण्याकरीता फेला असल्याचे सांगीतल्याने सदरचा दुहेरी खुनाचा गुन्हा ७२ तासाच्या आत उघडकीस आणण्यास यश प्राप्त झाले आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग, श्री. राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव, पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, शिवाजीराव विभुते, सपोनि म्हसवड पोस्टे, सपोनि सुधीर पाटील, रब्रिद भोरे, पोनि पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, अनिल वाघमोडे, फॉरेन्सिक विभागाच्या सपोनि रुपाली मोरे, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेवले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगधने, लेलेश फडतरे, अमोल माने, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, अमित माने, अविनाश चव्हाण, मोहन पवार, ऑमकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सांवत, पृथ्वीराज जाधव, मयुर देशमुख, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, धिरज महाडीक चालक शिवाजी गुरव सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, फॉरेन्सीक विभागाचे राजीव कुंभार, मोहन नाचण तसेच म्हसवड पोलोस स्टेशनचे रवि डोईफोडे, अमर नारनवर, शामराव वाघमारे, शिवाजी जाधव, अभिजीत बहाइले, नवनाथ शिरकुळे, यागेश सुर्यवंशी, धिरज कवडे, जगन्नाथ लुबाळ, भागवत बनसोडे, रुपाली फडतरे, मेना होंगे, यांनी सदरची कारवाई केली.
आहे.आरोपींची नावे :-
1) संदीप शेषमनी पटेल वय 30 रा. परसिधी , कारोल खुर्द, सिधी सिहवाल राज्य मध्य प्रदेश
2) अजितकुमार रामकिशोर पटेल वय 29 रा. परसिधी , सिधी सिहवाल राज्य मध्य प्रदेश
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com