मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने एक कार कंटेनरच्या खाली घुसल्याने २ जणांचा जागीच मृत्यू..

उपसंपादक : राकेश देशमुख
पोलादपूर :- शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकर नगर समोर महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक ऐन एल 01 ए ई 3150 ला मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या एम एच 03 सी एस 1177 या कारने मागून भरधाव वेगाने धडक दिल्याने भीषण अपघात घडला.
या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. मुंबई दिशेकडून होंडा कंपनीची कार रत्नागिरी जिल्ह्यात सुट्टीसाठी जात असताना चालक अनिल भीमा शिंदे याचे कर वरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या कंटेनरच्या मागील भागात जोरदार धडकली.
जवळपास अर्धी कार कंटेनरच्या खाली घुसली आणि यात दोन जणांचा मृत्य झाल्याची दुर्देवी घटना घडली.यावेळी या कार मध्ये ५ प्रवासी प्रवास करीत होते. या भीषण अपघातात २ जण जागीच मृत्युमुखी तर ०३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या मध्ये चालक अनिल भीमा शिंदे वय 40 राहणार पुणे, व सुमती यशवंत शिंदे वय 75 हे मयत झाले तर निलेश अनंत दळवी, जानवी निलेश दळवी वय 45, यश निलेश दळवी वय 18 सर्व राहणार खाणवली लांजा जखमी झाले आहेत.




अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे येथील कर्मचारी, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, नरवीर रेसक्यू टीम, श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com