२ कोटी ७० लाखांचा मुद्देमाल पळवणाऱ्याला मोलकरणीला पवईपोलीसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या. ..

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई :-घर मालकाचे २ कोटी ७० लाख १७ हजार ५१५ रूपयांचे दागिने व रोकड चोरणाऱ्या २३ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली.
ही कारवाई गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत पवई पोलिसांनी केली.
पवईतील उच्चभ्रू वसाहतीत एक कुटुंबिय राहतात. त्यांच्याकडे घरकामासाठी एक महिला यायची. त्या घरातील सोन्याचे दागिने व रोकड पाहून महिलेची नियत फिरली. तिने गेल्या ४ महिन्यांपासून संधी साधत ४,२०९ ग्रॅम सोने, ४२५ ग्रॅम चांदिचे दागिने (किंमत २ कोटी ६९ लाख ५६ हजार ७१५/- रूपये) व ६० हजार ८०० रूपयांची रोकड असा २ कोटी ७० लाख १७ हजार ५१५/- रूपयांचा मुद्देमाल थोडा थोडा चोरून नेला.
याबाबत समजताच घर मालकिणीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी (गु. र. क्र. २२७/२०२४ भादंवि कलम ३८१) गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपास करून संपूर्ण मुद्देमाल पवई पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया, परिमंडळ १० चे उपायुक्त मंगेश – शिंदे, एसीपी भारतकुमार सुर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी स.पो.नि. संतोष कांबळे, सपोनि राहुल पाटील, हवालदार तानाजी टिळेकर, बाबू येडगे, अंमलदार रवी ठाकरे, संदिप सुरवाडे, सूर्यकांत शेट्टी, शीतल लाड, वैशाली माधवन, भारती व पिसाळ (तांत्रिक मदत) यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com