घरफोड्या करणाऱ्या 2 गुन्हेगारांना अटक, किंमती 61,000/- रुपयांचा मुद्देमाल- हस्तगत, स्थानीक गुन्हे शाखा, गोंदिया पथकाची कामगिरी…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पो.ठाणे गोंदिया ग्रामीण हद्दीतील साई कॉलोनी, कवलेवाडा रोड, सहायता नगर, फुलचुरपेठ, गोंदिया येथील रहिवासी फिर्यादी श्री. दामोदर कुंजाम हे परिवारसह बाहेरगावी गेले असता घटना दिनांक 11/06/2023 रोजी चे 06.00 वा. ते दिनांक- 13/06 /2023 रोजी चे 11.00 वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे राहते घराच्या दाराचा टाळा तोडून घरातील लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागिने अंगठी, गोप, नगदी रुपये, सॅमसंग कंपनीचा टॅब, एच.पी कंपनीचे गॅस सिलेंडर, ॲक्सिस बँकेचे सही केलेले 2 चेक, घरघुती किराणा सामान असा किंमती-63,000/- रुपयांचा ऐवज चोरी करून नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो.ठाणे गोंदिया ग्रामीण येथे अप. क्रं. 210/2023 कलम 454, 457, 380 भादंवि अन्वये दाखल करण्यात आले होते.
पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. अशोक बनकर, यांनी नमुद घरफोडी गुन्ह्यांचे अनुषंगाने सर्व ठाणेदार- गोंदिया जिल्हा, तसेच पो. नि. स्थागुशा यांना नमूद घरफोडी करणाऱ्या , अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन तात्काळ गुन्हा उघड करण्याच्या निर्देश सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पो. नि. श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यातील घरफोडी, चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेत होते. दिनांक 13/07/2023 रोजी पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांना गोपनिय बातमीदार आणि तांत्रीक माहितीच्या आधारे माहिती मिळाली की, संशयित ईसंम नामे- 1) आतिश करोशिया, आणि 2) यश उर्फ कान्हा खंडेलवाल रा. दोन्ही बाजपेयी वॉर्ड, गोंदिया
यांनी मिळून नमूद घरफोडीचा गुन्हा केलेला आहे. अश्या प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे - ईसंम नामे* -

1) आतिश संतोष करोशिया, वय-28 वर्ष, रा. बाजपेयी वार्ड, गोंदिया
2) यश ऊर्फ कान्हा राजकुमार खंडेलवाल वय 19 वर्षे, रा.बाजपेयी वार्ड, गोंदिया*
यांना दिनांक- 14/07/2023 रोजी ताब्यात घेण्यात आले दोघांनाही विश्वासात घेऊन नमूद घरफोडी गुन्हयाबाबत सखोल विचारपूस चौकशी केली असता दोघांनी मिळून घरफोडी केल्याचे सांगीतले.
नमूद आरोपी यांचे ताब्यातून घरफोडी गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल -
1) एक सॅमसंग कंपनीचा गैलेक्सी टैब किंमत अंदाजे 10,000/- रूपये.
2) एक एच. पी. कंपनीचा गैस सिलेंडर किंमत अंदाजे 1000/-रुपये.
3) गून्ह्यात वापरलेली एक हिरो होन्डा स्लेंडर कंपनी ची मोटर सायकल एम. एच-35 एल- 3955 किंमत अंदा. 50,000/- रु. असा एकूण किंमती 61,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आले आहे.
गुन्ह्यात नमूद दोन्ही आरोपी यांना अटक करण्यात आली असून पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. नमूद गुन्हयाचा अधिकचा तपास पो. स्टे. गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा गोंदिया, पथकातील स.पो.नि. विजय शिंदे, पो.उप.नि.महेश विघ्ने, जीवन पाटील, पो.हवा. राजेंद्र मिश्रा, तुलसीदास लुटे, दिक्षित दमाहे, धनंजय शेंडे, पो.शि. संतोष केदार यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com