२ सराईत गुन्हेगार सहकारनगर पोलीसांकडुन अटक २,४०,०००/- किंमतीच्या ८ दुचाकी जप्त करून वाहन चोरीचे ६ गुन्हे उघड

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-

दि. २६/१२/२०२४ सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व सहकारनगर मार्शल असे वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना एका यामाहा दुचाकी गाडीवर बसून दोन इसम भरधाव वेगाने बिकानेर चौकाकडे जाताना दिसले. त्यांचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग करुन त्यांना थोडयाच अंतरावर गाडीसह थांबवुन ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाय पत्ता विचारता त्यानी त्यांची नावे १) अन्दर सलीम शेख वय २१ वर्षे धंदा गॅरेज काम रा. नुर मंहम मस्जिद गल्ली दाते बसस्टॉप सहकारनगर पुणे २) फरीद लालापाशा सय्यद वय १९ वर्षे धंदा गॅरेज काम रा.नुर मंहमद मस्जिद गल्ली दाते बसस्टॉप सहकारनगर पुणे असे असल्याची सांगीतले. त्यांचे ताब्यात एक यामाहा गाडी मिळुन आली त्या गाडी बाबत त्याच्याकडे चौकशी करता सदरची गाडी आम्ही दोघांनी साधारण दोन महिन्यापूर्वी दाते बसस्टॉप येथील रोडवरुन चोरली असुन तीथा वापर करुन ती के. के. मार्केट भागात पार्क केली होती. सदर गाडी विकण्यासाठी आम्ही गि-हाईक शोधत होतो. असे कबुल केले सदर गाडी बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३३२/२०२४ भा.न्या.स.२०२३ चे कलम ३०३(२) (जुना भादवि.क. ३७९) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीकडे अधिक चौकशी करता त्यांनी आणखी सात दुचाकी वाहने चोरल्याचे सांगितले सदर आरोपी कडुन एकुण २,४०,०००/- रु किंमतीची ८ वाहने हस्तगत करण्यात आली असुन सहकारनगर पोलीस ठाण्याकडील गु. रजि. नं. ३३२/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३(२) २) २१५/२०२३ भादवि ३७९ ३) ६७/२०२४ भादवि ३७९ ४) २९२/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३ (२) ५) ३५८/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३ (२) ६) १४१/२०२४ भादवि ३७९ असे ०६ वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. सदर आरोपी वर हत्यार बाळगले बाबत ०१ गुन्हा सहकारनगर पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत.

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त सौ पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सो, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे सो।, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, विनायक एडके, महेश मंडलिक, अमित पदगाळे, सागर सुतकर, खंदु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, अभिमान बागलाने, बबलु भिसे, सचिन येनपुरे, नामदेव केंद्रे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट