१९ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२४…

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :-दरवर्षी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या कौशल्यवृध्दीसाठी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये देशातील सर्व राज्यांतील पोलीस दलांचा तसेच केंद्रीय पोलीस दलाचा सहभाग असतो. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात बक्षिस प्राप्त करणे ही अभिमानाची बाब असून त्याचा सन्मान प्राप्त करण्यासाठी प्रत्येक राज्यातील पोलीस टिम मधील अधिकारी व अंमलदार आपआपल्या कौशल्याचे प्रदर्शन करीत असतात. सदर मेळाव्याची प्राथमीक सुरुवात म्हणून प्रत्येक राज्यांच्या अंतर्गत येणारे परिक्षेत्रांमध्ये अशा प्रमाणे परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या स्वरूपात विविध विषयांतील स्पर्धाचे आयोजन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात येते.







त्याअनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस दल आयोजित कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२४ दि.२४/०९/२०२४ ते दि.२६/०९/२०२४ रोजी दरम्यान पार पाडला जाणार आहे. सदर मेळाव्यामध्ये 1) Scientific Aids to Invastigation, 2) Police Photography, 3) Police Videography, 4) Anti-Sabbotage Check, 5) Computer Awareness, 6) Dog Squad Competition अशा मुख्य विषयांवर स्पर्धा होणार असून त्यामध्ये कोकण परिक्षेत्रामधील पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा पोलीस दलातील संघ सहभाग घेणार आहेत. सदरच्या स्पर्धा या निःपक्षपातीपणे व्हाव्यात याकरीता सदर विषयांचे तज्ञांना सदर स्पर्धेचे परिक्षण करण्याकरीता पाचारण करण्यात आलेले आहे.
कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२४ दरम्यान परिक्षेत्रातील एकूण ५ जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे आपल्या स्वकौशल्याप्रमाणे स्पर्धेकरीता आपआपल्या जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. एकूण ६ स्पर्धा प्रकार व २४ उपप्रकारांमध्ये प्रथम ३ येणाऱ्या स्पर्धकांना सुवर्ण, रजत व कांस्य असे पारितोषीक प्रदान करण्यात येणार आहे. यामधुनच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाची निवड करून सदर जिल्ह्यास सर्व साधारण विजेतेपद देवून सन्मानित करण्यात येईल.
कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२४ चे उद्घाटन कार्यक्रम दि. २४/०९/२०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे गोविंद बोडके, जिल्हाधिकारी पालघर यांचे हस्ते पार पडले. या कार्यक्रमास बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मेळाव्यासाठी कोकण परिक्षेत्रातुन आलेले सर्व पोलीस
अधिकारी व अंमलदार व पत्रकार बांधव उपस्थित होते. सदर मेळाव्याचे आयोजन संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर स्पर्धा निःपक्षपाती व पारदर्शकपणे तथा खेळी-मेळीच्या वातावरणात शिस्तबध्द पध्दतीने पार पाडली जाईल याकडे बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, सौ.संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उपअधीक्षक (गृह) पालघर यांनी वैयक्तीक लक्ष दिले असून स्पर्धेकरीता येणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com