इलेक्ट्रिसिटी बिल करण्याच्या बहाण्याने Anydesk अॅपद्वारे १,९९,९७५ /- रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस कापूरबावडी बेड्या ठोकून तक्रारदाराचे पैसे केले परत..
उपसंपादक-रणजित मस्के
कापूरबावडी: कापुरबावडी, ठाणे येथील तक्रारदार श्री मेने यांना इलेक्ट्रीसीटी बिल भरलेले नाही, त्यामुळे तुमचे इलेक्ट्रीसीटी कनेक्शन कट करण्यात येईल असा फोन येवुन त्यांना त्यांचे मोबाईलमध्ये Anydesk अॅप डाऊनलोड करावयास सांगुन त्याद्वारे १,९९,९७५/- रूपयांची आर्थिक फसवणुक झाली. त्यामुळे तक्रारदार यांनी तात्काळ सायबर सेल येथे संपर्क साधल्याने वपोनि निलम वाव्हळ यांचे मार्गदर्शनाखाली मपोना सुवर्णा हाडवळे, पोशि राजेंद्र नेगी व सायबर टीम यांनी फसवणुकीबाबत तात्काळ दक्षता घेवुन तांत्रिक कौशल्याचा वापर करून तक्रारदार यांची फसवणुक झालेली पुर्ण रक्कम परत मिळवुन देण्यात यश आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः मोबा.नं. 9920601001 info@surakshapolicetimes.com diptibhogal@surakshapolicetimes.com