सातारा गु.शाखेने घरफोडी १८, चोरीचे ८ असे एकूण २६ गुन्हे उघड करुन ४०,०५,४००/- रुपये किंमतीचे अर्धा किलो पेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने केले जप्त.

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :-दिनांक १३/३/२०२४ रोजीचे ११.३० ते सायंकाळी ५.३० वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद घराची कड़ी कोणत्यातरी हत्याराने तोडून आत प्रवेश करुन घराच्या कपाटातील ९,२९,५००/- रुपये किंमतीचे, २९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे, सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच साक्षीदार विजय किशोर पवार यांची ६,०००/- रोख रक्कम चोरुन नेली आहे त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं २५१/२०२४ भादंवि कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हा घरफोडीचा गंभीर स्वरुपाचा असल्याने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदर गुन्हा उघड करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी नमुद गुन्हा उघड करण्याकरीता सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली वेगवेगळी विशेष तपास पथके तयार करुन त्यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.
सदर गुन्हयाच्या घटनास्थळी अरुण देवकर पोलीस निरीक्षक व वरील तपास पथकांनी भेटी देवून घटनास्थळाची पहाणी केली, आजुबाजूच्या लोकांच्याकडे तपास केला. तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे व गोपनिय बातमीदारा मार्फत अज्ञात आरोपींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, तपासादरम्यान अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांना सदर गुन्हा पोलीस अभिलेखावरील आरोपी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले रा. रामनगर कटकेवाडी पो. वाघोली ता. हवेली जि. पुणे याने केला असून तो सातारा येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने, त्यांनी तपास पथकातौल अधिकारी व अंमलदार यांना नमुद आरोपीस ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि रोहित फार्णे व विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने नमुद आरोपी यास सातारा येथे पकडून ताब्यात घेतले व त्याच्याकडे कसोशिने व कौशल्याने तपास करुन त्याच्याकडून सदर गुन्हयासह १२ घरफोडीचे व २ चोरीचे असे एकुण १४ गुन्हे उघड करुन १९.७ तोळे सोने, चालु बाजारभावाप्रमाणे १३,१९,९००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व गुन्हा करण्याकरीता वापरलेली हत्यारे एक बोल्ट कटर व स्कू ड्रायव्हर असा माल हस्तगत केला.
तसेच तपास पथकांनी पोलीस अभिलेखावरील आरोपी १) रोहन बिरु सोनटक्के रा. मुरुम उमरगा जि. अहमदनगर २) महेंद्र रामाभाई राठोड रा. कुसेगांव दाँड जि.पुणे ३) संदिप झुंबर भोसले रा. वाघोली जि.पुणे ४) दोन विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून ६ घरफोडीचे व ६ चोरीचे असे एकुण १२ गुन्हे उघड करुन नमूद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी चालू बाजारभावा प्रमाणे २४,४५,५००/- रुपये किंमतीचे ३६.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व २,४०,०००/- रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
नमुद आरोपी यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी घरफोडीचे १८, चोरीचे ८ असे एकूण २६ गुन्हे उघड करुन चालू बाजार भावाप्रमाणे ३७,६५,४००/- रुपये किंमतीचे ५६.२ तोळे सोन्याचे दागिने व २,४०,०००/- रुपये रोख रक्कम असा एकूण ४०,०५,४००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी
असे एकुण १८९ गुन्हे उघड करुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ४ किलो ९८२ ग्रॅम वजनाचे ३,१०,८६,१००/- (तीन कोटी, दहा लाख, शहयांशी हजार, शंभर रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले याच्याकडून उघड केलेल्या गुन्हयांची माहितीः-
पोलीस ठाणे
सातारा शहर
२५१/२०२३
भादंविक ४५४,३८०
२९६/२०२३
भादंविक ४५४,३८०
८०७/२०२३
भादंविक ४५४,३८०
शाहुपूरी शाहुपुरी
४११/२०२३
भादंविक ४५४ , ३८०
१५५/२०२४
भादंविक ४५४,३८०
६४/२०१७
भादविक ४५४,३८०
सातारा तालुका
५७९/२०२३
भादंविक ४५४,३८०
खंडाळा
३/२०२४
भादंविक ४५४,३८०
८/२०२४
भादंविक ३८०
कोरेगांव
४९५/२०२३
भादविक ३७९
२२/२०२४
४७३/२०२३
भादंविक ४५४,३८० भादंविक ४५४,३८०
वडूज
उब्रग
४०/२०२४
भादंविक ४५४,३८०
१४. -: आरोपी रोहन बिरु सोनटक्के याच्याकडून उघड केलेल्या गुन्हयांची माहितीः-
२७३/२०२३
भादंविक ४५४,३८०
पोलीस ठाणे
सातारा शहर
कराड शहर
फलटण शहर
गु.र.नं. ८९/२०२३
८६/२०२३
८९/२०२३
१४८/२०२३
कलम
भादंविक ४५४,३८०
भादविक ३७९
भादंविक ४५४,३८० भादंविक ४५४,३८०
- आरोपी महेंद्र रामाभाई राठोड याच्याकडून उघड केलेल्या गुन्हयांची माहितीः- कलम
पोलीस ठाणे
वाई
२९६/२०२३
५७२/२०२३ झुंबर भोसले याच्याकडून
भादंविक ४५४.४५७.३८०.३४.४११
भादंविक ४५७,३८० उघड केलेल्या गुन्हयांची माहितीः-
- आरोपी संदिप
पोलीस ठाणे
सातारा शहर
२५१/२०२३
३६२/२०२३
११०/२०२४
कोरेगांव
४८१/२०२३
११०/२०२४
कलम
भादंविक ३७९ भादंविक ३७९
भादंविक ३७९
भादंविक ३७९
भादंविक ३७९
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधोक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, लेलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, अमोल माने, जयवंत खांडके, हसन तडवी, सनी आवटे, अजित कर्णे, प्रविण कांवळे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अमित माने, स्वप्निल माने, मनोज जाधव, शिवाजी भिसे, राजू कांबळे, अरुण पाटील, अमित झेंडे, अजय जाधव, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, विक्रम पिसाळ, मोहन पवार, ऑकार यादव, विशाल पवार, केतन शिंदे, धीरज महाडीक, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, स्वप्निल बॉड, मयूर देशमुख, प्रविण पवार, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम, महिला पोलीस अंमलदार दिपाली यादव, सौजन्या बागल, अधिका बीर, शकुंतला सणस, प्रिती पोतेकर, अनुराधा सणस अंगुलीमुद्रा विभागाचे सपोनि विजय जाधव, श्रीमती रुपाली मोरे, पोलीस अंमलदार गजानन तोडकर, मोहन नाचण, राजीव कुंभार, अमोल जाधव, अनिल खटावकर, सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रशांत मोरे, महेश पवार, यशवंतराव घाडगे, रणजित कुंभार, ओंकार डुबल यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com