पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून ३ घरफोडीचे गुन्हे उघड करुन १८.३ तोळे सोन्याचे चांदीचे दागिने जप्त..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-माहे जुन २०२४ मध्ये गोरखपुर पिरवाडी ता. जि. सातारा. येथे राहणा-या सुप्रसिध्द सिनेतारीका यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून घरामध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले सुमारे ३,८२,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा ऐवज घरफोडी चोरी करुन घेवुन गेले होते. नमुद घटनेबाबत यातील तक्रारदार यांनी दिले तक्रारीवरुन सातारा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. ५०३/२०२४ भादविस कलम ४५४,४५७,३८०, अन्वये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

नमुद गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मा.श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सदरचा घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचेकडे तपासास देवून नमुद गुन्ह्यासह इतर घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा वांना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्याकरीता सहाय्यक पोलीस निरीक्षक, पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे व पोलीस उप-निरीक्षक विश्वास शिंगाडे व अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली विशेष तपास पथके तयार करुन त्यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.

दि.२८/०६/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा पोलीस अभिलेखावरील आरोपी नामे राजकुमार उर्फ राजु ऑकारप्पा आपचे रा. कोथळी ता. उमरगा जि. वाराशिव याने केला असुन तो सातारा शहर व तालुका परिसरात वावरत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना बातमीचा आशय सांगुन नमुद इसमास ताब्यात घेवून पुढील कारवाई करणेच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि पृथ्वीराज ताटे, रोहित फाणे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या तपास पथकाने नमुद संशवीत इसमास पेट्रोलींग दरम्यान वाढेफाटा परिससरात सापळा लावून १८.०० वा.चे सुमारास ताब्यात घेतले. सदर आरोपी नामे राजकुमार उर्फ राजु ओंकारप्पा आपचे वय ३० वर्षे रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव वाचेकडे तपास पथकाने कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याने सातारा शहर, भुईज व लोणंद पोलीस स्टेशन येथील घरफोडी ३ गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडून घरफोडी चोरीचे एकुण ०३ गुन्हे उघड करुन एकुण १८.३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे बाजार भावाप्रमाणे १२,४४,४००/-रु. व ७०००/- रु. किं.ची चांदीचे दागिणे व ८०,०००/- रु. कि.ची गुन्हा करणेसाठी वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण १३,३१,४००/- (बाजार भावाप्रमाणे) रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

माहे नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी. इत्तर चोरी असे एकूण २९२ गुन्हे उघड करुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ६८४.५ तोळे (६ किलो ८४५ ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिणे व १२ किलो चांदी असा एकूण ४.७८.३१,३००/-(चार कोटी अष्ट्याहत्तर लाख एकतीस हजार तीनशे रुपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपी राजकुमार उर्फ राजु ओंकारप्पा आपचे याच्याकडून उघड केलेल्या गुन्हयांची माहितीः-

पोलीस ठाणे

सातारा शहर

भुईज

लोणंद

ग.र.नं.

५०३/२०२४

१९२/२०२४

भादंविक ४५४.४५७,३८० भादंविक ४५४,३८०

२१९/२०२४

कलम

भादंविक ४५४,४५७,३८०

सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा,
यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज
ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्ण, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिष घाडगे,संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लेलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अरुण पाटील,अमित माने, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, स्वप्निल कंभार, विक्रम पिसाळ, मोहन पवार,ओंकार यादव, सचिन ससाणे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, केतन शिंदे, प्रविण पवार, मयुर देशमुख,
शिवाजी गुरव, अमृत कर्षे यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख,
पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट