विरार गुन्हे प्रकटीकरण पोलीसांच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचे रिक्षामध्ये अनावधानाने राहिलेली १,६५,०००/- रुपये रोख रक्कम ४० मिनिटाच्या आत केली परत …

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

विरार:

दिनांक ०९/०८/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. चे सुमारास इसम नामे- उमरअली युसूफअली सय्यद,रा.जळगांव हे जळगांव येथुन पेल्हार येथे पिकअप गाडी खरेदी करण्यासाठी आले होते, त्याकरीता त्यांनी पिकअप गाडी खरेदी करण्यासाठी आणलेली रोख रक्कम रुपये १,६५,०००/- ही त्यांच्या जवळ असलेल्या बॅगमध्ये ठेवलेली होती. ते विरार पूर्व येथुन रिक्षाने विरार फाटा येथे जात असतांना त्यांची पैशांची बॅग रिक्षामध्येच विसरले असले बाबत पोलीस ठाण्यात ११.०० वा. कळविल्याने विरार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे दालनात बोलावुन योग्य त्या सुचना देवुन सदर रिक्षाचा व रिक्षा चालकाचा शोध घेणेकामी रवाना केले.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी / कर्मचारी यांनी संबंधीत रिक्षा स्टॅण्डवर जावुन सदर ठिकाणी असलेल्या रिक्षा चालकांकडुन विरार फाटा येथे जाणाऱ्या रिक्षाचा व चालकाचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन सदर मोबाईल क्रमांकाचे टॉवर लोकेशन प्राप्त करुन सदर ठिकाणी गेले असता रिक्षा व बॅग मिळुन आल्याने ती चेक करुन पाहिले असता त्यामध्ये रोख रक्कम १,६५,०००/- रुपये मिळुन आली.

सदरची रोख रक्कम ही मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र कांबळे, प्रभारी अधिकारी, विरार पोलीस ठाणे यांनी उमरअली युसूफअली सय्यद, रा. जळगांव यांचेकडे सुपूर्द केली.

सदरची कामगीरी श्री.सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, श्री. रामचंद्र देशमुख,सहा पोलीस आयुक्त, विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दिलीप राख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील स.पो.नि. ज्ञानेश फडतरे, पो. हवा. सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, पो. अं. मोहसिन दिवान, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, सचिन बळीद, प्रफुल्ल सोनार यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट