प्रेयसीबद्दल सतत वाईट बोलणाऱ्या १६ वर्षीय मित्राचा सळईने भोसकून खून करणाऱ्या आरोपीला १० तासात दिव्यात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई :– प्रेयसीबद्दल सतत वाईट बोलणाऱ्या १६ वर्षीय मित्राचा १० ते १२ वेळा सळईने भोसकून खून करणाऱ्या १९ वर्षीय ऋषिकेश गुरव याला अटक करण्यात आली.

या आरोपीला गुन्हा घडल्यापासून अवघ्या १० तासांत ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरातून अटक करण्यात आली.

घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतसुर्यमुखी साईबाबा मंदीराजवळ, डिजीक्यु कॉम्प्लेक्स समोर १६ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने वार करून गंभिर प्राणघातक जखमा करून खुन केल्याने गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांना समजली. या प्रकरणी (गु.र.क्र.३५०/२०२४, कलम ३०२ भादंवि सह १३५, ३७ (१) (अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ (सी.सी.टि.एन.एस.क्र.५१८/२०२४) अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट ७ चे पथकही करून लागले. तपासी पथकाने सर्वप्रथम घटनास्थळी भेट देवून घटनास्थळी व आजूबाजूच्या परीसरात सविस्तर चौकशी केली असता मृत मुलाचे नाव श्रवण साळवे तर आरोपीचे नाव ऋषिकेश गुरव असल्याचे समजले.

आरोपी हा दिव्यातील दातिवली (जि.ठाणे) येथे लपून बसल्याची खात्रिशीर माहिती प्राप्त झाली. सदर ठिकाणी कक्ष-७ च्या पथकाने जावून नमुद आरोपीस ताब्यात घेतले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती,  पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशी कुमार मिना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), विशाल ठाकूर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व), चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महेश तावडे, पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  तानाजी उबाळे, हवालदार संतोष गुरव, शशिकांत कांबळे, अजय बल्लाळ, विनोद पांडे, सचिन गलांडे, अंमलदार विकास होनमाने, महेश सावंत, राजाराम कदम यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट