१५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन मा. पोलीस निरीक्षक श्री भैरु तळेकर पोलीस निरीक्षक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी वीर माता व वीर पत्नी यांचे हस्ते पोलीस ठाणेचा ध्वजारोहन करुन वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला….

उपसंपादक-रणजित मस्के
मिरज :-शहीद जवान बाळासो रघुनाथ पाटील (मराठा रेजिमेन्ट २७ आर आर) रा.सोनी ता. मिरज यांना जम्मु काश्मीर (पुर्व सेक्टर) येथे दुश्मनासोबत लढताना सन १९९६ मध्ये वीरगती प्राप्त झाली होती. तसेच शहीद जवान विजय सुभाष मोरे (महार रेजिमेंन्ट सागर मध्यप्रदेश) रा. कवठेमहांकाळ हे दक्षिण आफ्रिका येथे शांतीसेनेत असताना नेशन द्वारे सुडान ऑपरेशन राबवित असताना सन २००९ मध्ये वीरगतीस प्राप्त झाली होते.
देशरक्षणार्थ आपल्या प्राणाचे सर्वोच्य बलिदान देणा-या शहीद बाळासो पाटील यांची वीरमाता विमल रघुनाथ पाटील वय-६५ वर्षे रा. सोनी ता. मिरज व शहीद विजय मोरे यांची वीर पत्नी सुनिता विजय मोरे वय ३७ वर्षे रा. कवठेमहांकाळ यांना पोलीस ठाणेत बोलावुन वीरमाता व वीरपत्नी यांचे हस्ते पोलीस ठाणेचा ध्वजारोहन करण्यात आला. त्यांना शाल श्रीफळ व साडी चोळी भेट देवुन सन्मान करणेत आला. त्यांचे बलिदानाचे ऋण व्यड़त केले.
ध्वजारोहनाकरीता पोलीस निरीक्षक श्री भैरु तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाणेचे अधिकारी, पोलीस अंमलदार, आजी-माजी पोलीस, नागरीक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात संपन्न झाला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com