कुणबी समाज पंधरा गांव कमिटी बोर्ली मुंबई विभागाची १४ वी वार्षिक अहवाल सभा मोठ्या उत्साहात संपन्न..

0
Spread the love

प्रतिनिधी-मनोहर आगोंडे

मुंबई :– तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड येथील कुणबी समाज बांधवांनी त्यांच्या बोर्ली विभाग कुणबी समाज पंधरा गाव कमिटी मुंबई, या कमिटीच्या द्वारे रविवार दिनांक १४/०७/२०२४ रोजी शिशु नरवणे हायस्कूल, कांदिवली पश्चिम, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ वार्षिक अहवाल सभेत वार्षिक अहवाल सन २०२३-२४ उत्तमरीत्या सादर करून उपस्थितांची मने जिंकली सोबत तालुक्यात प्रथमच विभागीय स्तरावर कुणबी समाज महिला मंडळ स्थापन केले त्यास मान्यता घेत पुन्हा एकदा तालुक्यात बदलाचे वारे हे आपल्या विभागातून वाहतात हे सिद्ध केले.

कार्यक्रमात सर्वोच्च क्षण म्हणजे CA या पदवीधर परीक्षेत श्रीवर्धन तालुक्यातून या वर्षी दोन कुणबी समाजातून उतिर्ण झालेले CA अंकित सुर्यकांत गीजे आणि CA गणेश किसन भाये आणि भारतीय सेना दलात भरती झालेले कुमार हरषू मधुकर भुवड यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम हा बोर्ली कुणबी समाज पंधरा गाव कमिटी मुंबईचे विद्यमान अध्यक्ष श्री. संजय ना. भोसलेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला सोबत श्री. संतोष कदम (सचिव), श्री. नितेश तुरे (खजिनदार)आणि श्री. सुरेश भुवड, श्री. सुर्यकांत गिजे, श्री. प्रकाश कदम, श्री. रवींद्र धासरे, श्री. गोविंद आगरी आणि नवनिर्वाचित महिला मंडळ तसेच मुख्य कार्यकारी मंडळ आणि समाज कार्यकर्ते, बांधव आणि समाज भगिनी यांची उपस्थिती कार्यक्रमास प्रथानिय अशी होती.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट