पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारामध्ये 128 अर्ज निकाली…

उपसंपादक- मंगेश उईके
पालघर :– दि. 16(जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालय येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारामध्ये 128 अर्ज निकाली काढण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10:30 वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सवरा, माजी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्व विभागातील विभाग प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते.





जनता दरबारामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 340 नागरिकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 128 अर्ज निकाली काढण्यात आले. तर 112 अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वतः नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेऊन त्यांचे अर्ज निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुढील जनता दरबार 23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com