१२ वर्षीय मुलावर अत्याचार व त्याचा खून करून मृतदेह डबक्यात फेकणारया सख्ख्या भावांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :– अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला विरोध केल्याने १२ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सख्ख्या भावांना अटक केली आहे. हा मुलगा बेपत्ता झाल्या प्रकरणी शिळ डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या आरोपी मुलाचा मृतदेह हातपाय बांधून नवी मुंबईतील एका डबक्यात फेकला होता.

२५ मार्च रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास शाह यांचा मुलगा सानू अहमद राहत्या घराबाहेर खेळण्यास गेला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी परत आला नाही. शाह यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो भेटला नाही. या शिळ डायघर पोलिसांनी (गु. रजि. नं. ६७५/२०२४) भा.दं.वि. कलम ३६३ नुसार गुन्हा नोंद दाखल केला.

मुलाचा शोध सुरू असताना सानूचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत तळोजा पोलीस ठाणे, नवी मुंबई ह‌द्दीत आडीवली किरवली गावाजवळील ओढ्यातील पाण्याच्या डबक्यात आढळला. तळोजा पोलिसांनी शिळ डायघर पोलिसांशी संपर्क साधुन ओळख पटविली असता तो मृतदेह सानूचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास शिळ डायघर पोलिसांकडे वर्ग केला.

या गुन्ह्यात नव्याने भादंवि कलम ३६४,३०२ नोंद करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासासाठी शिळ डायघर पोलीस ठाण्याचे व मुंब्रा, कळवा, गुन्हे प्रकटीकरण पथकांची पथके नेमण्यात आली. या पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे काही संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यापैकी रमजान मोहम्मद कुद्दुस शेख (वय 20 वर्षे, व्यापारी, रा. गल्ली क्र.03, आबिदभाई चाळ, ठाकुरपाडा, मु.पो. दहिसर, ता. जिल्हा. ठाणे), मोहम्मद आझाद कुद्दुस शेख (वय ३० वर्षे, व्यापारी, रा. गल्ली नं.03, आबिदभाई चाळ,ठाकूरपाडा, पो. दहीसर, ता. जि. ठाणे) यांनी मुलाचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी व मृत सानू हे ठाकुरपाडा (पिंपरी) या एकाच परिसरात रहाणारे असुन एकमेकांना ओळखतात. रमजान याने आमिष दाखवून सोनूला निर्जन स्थळी नेले. त्या ठिकाणी आरोपीत त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने विरोध करताच रमजान याने त्याच्या डोक्यात दगड मारून त्याला बेशुध्द केले व कपड्याने त्याचा गळा आवळून जिवे मारले.

त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रमजान याने मोहम्मद आझाद याला मदतीला घेतले. दोघांनी सानूचा हात पाय बांधुन त्यास ओढयाच्या डबक्यात पाण्यात फेकुन दिल्याची कबुली दिली.
या गुन्ह्याची उकल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, परिमंडळ १, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, कळवा विभाग, शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पो.नि. (गुन्हे) सुनिल वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. महेश काळे, सपोनि अब्दुल मलीक, स.पो.नि. अभिषेक नामपल्ले, तसेच तपास पथकातील अंमलदार हवालदार महेंद्र गायकवाड, गोविंद पाटील, राकेश सत्रे, सचिन कोळी, सुशांत पाटील, अमोल पवार, हनुमंत मोरे, अंमलदार कृष्णा बोराडे, राजेंद्र सोनवणे, अक्षय पाडळे, समाधान माळी यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट