१२ वर्षाचा मुलांनी हरवलेला आयफोन I phone 13 केला पोलिसांच्या स्वाधीन….

0
Spread the love

प्रतिनिधी-विश्वनाथ शेनाॅय

ठाणे :

लहान मुलाच्या प्रामाणिकपणाचे केले पोलीसांनी कौतुक…!

दि ०५ डोंबिवली ठाणे
डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड सोहम नरेश परदेशी वय बारा वर्ष जय हिंद कॉलनी या ठिकाणी तो आपल्या मित्राबरोबर संध्याकाळी खेळत असताना खेळता खेळता चेंडू एका झाडाजवळ जाऊन पडला सोहम हा त्या चेंडू उचलायला गेला असता त्या ठिकाणी I phone 13 किंमत अंदाजे १,००,०००/-असावा त्याला मिळाले असून त्यांनी त्यांच्या वडिलांना फोन करून झालेल्या सविस्तर माहिती दिल्यानंतर त्यांचे वडील नरेश परदेशी यांनी विष्णूनगर पोलीस स्टेशन डोंबिवली पश्चिम पोलीस निरीक्षक (गुन्हे ) गहिनीनाथ गमे यांना सोपवण्यात आले.

या लहान मुलाचे प्रामाणिक पणा बघून पोलीस स्टेशन मधील सर्वांनी त्याचे कौतुक केले. मिळालेला मोबाईल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलेले माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) गहिनीनाथ गमे यांनी दिली आहे. पोलिसांनी असेही आव्हान केले आहे ज्याची हे मोबाईल आहे त्यांनी आपली ओळख पटवून व मोबाईलची सर्व कागदपत्रे घेऊन हे मोबाईल घेऊन जाण्याची माहिती त्यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *