चेन स्नॅचिंग गुन्हयातील आरोपीचा १२ तासाचे आत शोध घेऊन ताब्यात घेण्यात सातपुर पोलीसांना मोठे यश…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक

फिर्यादी सौ. कांता शांतीलाल बरडिया, वय ६६ वर्षे, व्यवसाय- गृहिणी, रा. रूम नं.७७२, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, सातपुर, नाशिक मो.नं. ९४०३१६२७२१ हया त्यांचे पती शांतीलाल बरडिया सह जेवण करून रात्री ०९:०० वा.चे सुमारास त्यांचे राहते घराचे पायरीवर बसले होते. त्यानंतर त्यांचे पती शांतीलाल बरडिया है। फिरण्यासाठी गेले असता फिर्यादी हया एकटयाच बसलेल्या होत्या. रात्री ०९:१० वा. चे सुमारास एक इसम पायी चालत आला व त्याने फिर्यादीच्या गळयातील दोन तोळे सोन्याची मंगळसूत्र पोत (किंमत रु. ६०,०००/-) खेचुन जिजामाता शाळेच्या ग्राऊंडकडे पळून गेला. त्यावेळी फिर्यादीने मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने गल्लीतील लोक जमा झाले. त्यांनी सदर इसमाचा शोध घेतला असता मिळून आला नाही. यावरून फिर्यादी सौ. कांता शांतीलाल बरडिया यांनी सातपुर पो.स्टे. येथे गुरनं. ३०५ / २०२३ भादंवि कलम ३९२ प्रमाणे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला.

त्याअनुषंगाने सातपुर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथक तात्काळ घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून गुन्हयाचे वस्तुस्थितीची माहिती घेतली. तांत्रिक पध्दतीने आरोपींचा शोध घेणे आवश्यक असल्याने तपासास गती देवून शोध मोहिम सुरू केली. त्यावर सदर इसमाचे नाव व पत्ता स्थानिक गोपनिय बातमीदाराकडून गोपनियरित्या माहिती मिळविली असता त्याचे नाव विरेन चेतन वाघ असे असल्याचे समजले. त्यावरून त्याचे राहते घर रूम नं.१२८५, एम. एच.बी. कॉलनी, शिवनेरी गार्डन, सातपुर कॉलनी, सातपुर, नाशिक येथे छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडून गुन्हयातील गेलेला मुद्देमाल दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र पोत (किंमत रु. ६०,०००/-) हस्तगत केले आहे.

सदर गुन्हातील आरोपीताचा शोध घेण्याकरीता मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर, मा. शेखर देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर यांचे मार्गदर्शन व सातपुर पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंकज प्रल्हाद भालेराव यांचे सुचनांप्रमाणे गुन्हे पथकाचे अधिकारी पोउनि श्री बाळासाहेब वाघ, तपास अधिकारी पोउनि अश्विनी उबाळे तसेच पोहवा / ११३ विलास गिते, पोहवा / ५८६ दत्तु गायकवाड, पोना / १७५८ दिपक खरपडे, पोअ / १६०५ सागर गुंजाळ, पोअ / २१०३ अनंता महाले, पोअं/ २२४६ संभाजी जाधव, पोअं/ १४८ रामनाथ पाटील, पोअ / १५१५ भूषण शेजवळ, चापोअ / ७०७ रोहिदास कनोजे व चापो / ११४ विश्वास पाटील यांनी कामगिरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट