राज्य उत्पादन शुल्क पालघर विभागामार्फत १,०१,३९,०९० रकमेची दारू जप्त..

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर :-दि 6 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करीता आचारसंहिता दि. १५ ऑक्टोबर, २०२४ पासुन लागु झालेली आहे. करीता अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पालघर या विभागाव्दारे गेल्या २० दिवसात दारुबंदी कायद्यान्वये एकुण ९९ गुन्हयाची नोंद करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये विदेशी मद्य ९२.२२ ब.लि., बिअर-३२.५ ब.लि., देशी मद्य-६.०३ ब.लि., ताडी-१०३५ ब.लि., परराज्यातील विदेशी मद्य व बिअर एकुण- १८४८.६ ब.लि., हातभट्टी दारु ११९० ब.लि., व रसायण ७१९२० व इतर १८४ असा मुद्येमाल जमा केला असुन त्या मुद्येमालाची एकुण रु. १,०१,३९,०९०/- एवढी आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ आचारसंहिता लागु झाल्यानंतर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध दारु निर्मिती व वाहतुक या बाबी लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, , जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवणूक अधिकारी गोविंद बोडके, राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे संचालक प्रदास सुर्वे, संचालक, प्रदिप पवार, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल. कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नेमणूक करुन संपुर्ण पालघर जिल्हयात अवैध मद्य निर्मिती , विक्री व वाहतुक करणाऱ्या इसमावर धडक कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाईमध्ये अवैध गावठी दारु निर्मिती विक्री वाहतुकीचे एकूण ६५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच आचारसंहिता कालावधीमध्ये परराज्यातुन येणाऱ्या अवैध मद्याचे एकुण १७ गुन्हे दाखल असुन त्यामध्ये एकुण १८४८.०६ ब.लि. मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच त्यामध्ये एकुण ८ वाहनासह एकूण रु.५७,१४,५२०/- किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट