१ लाख ९४ हजार रुपये किमतीचा ९ .७ किलो गांजाच्या झाडासह स्था. गुन्हे शाखा व पोलीस ठाणे रेणापूर यांनी केली कारवाई..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

लातूर

          याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर जोरदार कार्यवाही करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात दिनांक 15/07/2025 रोजी दुपारी पोलीस ठाणे रेणापूर अंतर्गत निवाडा गावाच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखा लातूर व पोलीस ठाणे रेनापुर च्या पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करत निवाडा गावाच्या गायरान जागेमधून  01 लाख 94 हजार 400 रुपयांचा 09.07  किलो लागवड करण्यात आलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. 
      रेनापुर तालुक्यातील निवाडा गावात गायरान खुल्या जागेवर गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याअधारे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, रेनापुर पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांच्या नेतृत्वातील पथकाने  निवाडा गावातील  गांजाचे झाडे लावलेल्या गायरान जमिनीवर टाकून गांजाची 09.07 किलो वजनाची झाडे जप्त केली आहे.
       या प्रकरणी पोलीस ठाणे रेनापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात सदर गायरान जमिनीच्या जवळ राहणारा व सदरची जमीन ताब्यात बाळगणारा इसम नामे

1) विजयकुमार राघू गायकवाड, वय 45 वर्ष राहणार निवाडा, तालुका रेनापुर जिल्हा लातूर.

           याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
      सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस ठाणे रेनापुर चे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांच्या नेतृत्वात पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, आदिनाथ पाटील नंदलाल चौधरी पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, गणेश साठे, सतीश सारोळे, विश्वनाथ गिरी, शिवकुमार कच्छवे, दत्तात्रय गिरी, चंद्रकांत केंद्रे, अरुणकुमार बनसोडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट