सांगली शहरामध्ये मोटार सायकल चोरी करणारा १ आरोपी जेरबंद ९५,०००/- रु. किंमतीच्या २ मोटार सायकली हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-पोलीस स्टेशन एम.आय.डी सी. कुपवाड पोलीस ठाणे

अपराध क्र आणि कलम

फिर्यादी नाव

गु.आर.नं. 185/2024 B.N.S. 2023 पेन

व्यंकटेश दुर्गाप्पा शेलार, रु. वडेर स्ट्रीट, अथनी. ता. अग्रणी, जि. बेळगाव, कर्नाटक राज्य.

३०३(२) प्रमाणे

माहिती कशी प्राप्त झाली

गु.दा.ता. वेळ

दि. ०१.०८.२०२४ रोजी दुपारी १३.०० वा ते १३.३० वा चे दरम्यान

ता. ०९/०८/२०२४ रोजी २१.१९ चा.

सपोफी / अनिल ऐनापुरे पोहेकोन / 429 इसन मुल्ला.

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे, स्टेशन. गु. ए. शा, सपाफी/अनिल ऐनापुरे, पोहेकोन/इसन मुल्ला, आमसिद्धा खोटे, अमोल ऐडले, संकेत मगदूम, हणमंत लोहार, पोना/सोमनाथ गुंडे, पोशी/सुनील जाधव, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, स्थान. गु. ए. शा.

26/07/2024 रोजी अटकेची वेळ आरोपीचे नाव व पत्ता

१. प्रदीप कल्लाप्पा हलीगनली, वय 32, रु. जैन बस्ती, शिरहट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव, कर्नाटक,

उघड गुन्हे १. एम.आय.डी सी. कुपवाड पोलीस ठाणे, गु.र.नं. १८५/२०२४ बी.एन.एस. २०२३ कलम ३०३ (२) प्रमाणे २

. कुडची पोलीस ठाणे, राज्य कर्नाटक, गु.र.नं. १८५/२०२४ भादविसं कलम ३७९ प्रमाणे

जप्त मुद्देमाल

१. ५०,०००/-रु. किंमत 1 Honda CB Shine Black Chocolate Motorcycle Ju.W.K.A. 2. ४५,०००/-रु. किमतीची डायमंड कंपनी HF डिलक्स ब्लॅक रेड मोटरसायकल Ju.Va.Kin.An.

१५,०००/- (पंच्चाक्षय हजार रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काबुन त्यांचेचर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटार सायकल चोरी करणारे संशयीत इसमांची माहिती काबुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. ११/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकातील सपाफी अनिल ऐनापुरे आणि पोहेकों/ इम्रान मुल्ला यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम लोकल बोर्ड कॉलनी, विश्वामचाग येथे चोरीची काळया रंगाची हॉण्डा कंपनीची सी बी शाईन मोटार सायकल विक्री करण्याकरीता आला आहे.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे लोकल बोर्ड कॉलनी, धामणी चौक परिसरात जावून निगराणी करत असताना, बातमीतील नमुद हकिकती प्रमाणे एक इसम विना नंबर प्लेटची काळया रंगाची सी. बी. शाईन मोटार सायकल घेवून रोड कडेला थांबलेला दिसला. सदर इसमाचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्यांचे नाव व गाव विचारता त्याने त्याचे नाव प्रदीप कल्लाप्पा हळीगंळी, वय ३२ वर्षे, रा. जैन बस्ती, शिरहट्टी, ता. अथणी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष त्याचेकडे असलेल्या मोटार सायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, प्रदीप हळीगंळी याने सांगितले की, त्याने काही दिवसापुर्वी कुपवाड मधील हॉटेल राजमुद्रा जवळून सदरची मोटार सायकल चोरी केली असल्याची कबूली दिली. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, त्याने काही दिवसापूर्वी चिंचणीच्या यात्रेतून आणखी एक हिरो कंपनीची एच. एफ. डिलक्स मोटार सायकल चोरी केली असल्याचे सांगुन ती धामणी रोडवर असले हॉलचे पाठीमागे लावली असल्याचे कबूल केले. लागलीच पंचासोचत त्याने मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता वर नमुद मोटार सायकल तेथे मिळून आली.

सदरच्या मिळालेल्या मोटार सायकलीबाबत पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पडताळला असता, एम.आय.डी.सी कुपवाड पोलीस ठाणे व कुडची पोलीस ठाणे, राज्य कर्नाटक येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरच्या मोटार सायकली पुढील तपासकामी सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पंचासमक्ष जप्त केल्या.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन, पुढील तपास एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट