ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 1.5 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश..
उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :- रविवार दिनांक 29/10/2023 रोजी लोणंद पोलिस स्टेशन हद्दीतील तांबवे ता. फलटण जिल्हा सातारा,गावातील श्री रोहित दशरथ शिंदे यांच्या ऊसाला रात्री 9:30 वाजता आग लागलेली होती.
हे कळताच गावचे पोलीस पाटील श्री सागर पोपट शिंदे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी धावले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले, व उर्वरित 1.5 एकर ऊस वाचविण्यात यश आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com