मोटारसायकल चोरीचे ०५ गुन्हे उघडकिस आणून ०५ मोटारसायकल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना यश

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर :- पालघर जिल्ह्यात चालु वर्षात वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. त्यातील आरोपीत निष्पन्न नव्हते. मोटारसायकल चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले. त्या अनुषंगाने श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पोलीस उपनिरीक्षक / सागर पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे अमंलदार यांचे पथक तयार करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या.

सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन तसेच गोपणीय बातमीदारामार्फत सरावली बोईसर येथे राहणारा संतोष पाटील व त्याचा मित्र गणेश मोरे हे पालघर- बोईसर परीसरातील मोटार सायकल चोरी करतो अशी माहीती मिळाली. मिळालेल्या बातमीच्या आधारे सदर संशयीत आरोपीचा शोध घेतला असता त्यास सरावली येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपीत १) संतोष बापुराव पाटील, वय २५ वर्ष, सध्या रा. रूम नं. ०३, स्वामी समर्थ बिल्डींग, रमा पार्वती नगर, सरावली, बोईसर पश्चिम, ता. जि. पालघर मुळ रा. शनिमंदिरा जवळ, कोष्टे गल्ली, भाटेवाडीच्या मागे, पारोळा, ता. पारोळा, जि. जळगाव २) गणेश छोटू मोरे, वय २५ वर्ष, सध्या रा. रूम नं. ०३, स्वामी समर्थ बिल्डींग रमापार्वती नगर सरावली, बोईसर पश्चिम, ता. जि. पालघर मुळ रा. मु. पो. टिटवी ता. पारोळा, जि. जळगाव यांना ताब्यात घेऊन बोईसर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. २९४/२०२३ भा.द.वि.स. कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी पालघर व बोईसर परिसरात पार्किंग मध्ये लाऊन ठेवलेल्या मोटारसायकल चोरी करीत असल्याचे कबूल केले.

नमूद आरोपींनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पालघर पोलीस ठाणे

3

बोईसर पोलीस ठाणे

बोईसर पोलीस ठाणे

गुन्हा रजि नं १६८ / २०२३ भा.द.वि.स.कलम ३७९, ३४

बोईसर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं २२९/२०२२ भा.द.वि.स. कलम ३७९, ३४

गुन्हा रजि नं २१२ / २०२३ भा.द.वि.स.कलम ३७९, ३४

बोईसर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. २३९/२०२३ भा.द.वि.स. कलम ३७९, ३४

गुन्हा रजि नं. २९४/२०२३ भा.द.वि.स. कलम ३७९, ३४
आरोपींकडून वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या १,२५,०००/- रुपये किंमतीच्या एकुण ०५ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि / सागर पाटील, पोहवा / कैलास पाटील, पोहवा / दिनेश गायकवाड, पोहवा / संदिप सरदार, पोहवा / कपिल नेमाडे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट