मोटार सायकल चोरीचे ०५ गुन्हे उघडकिस आणुन ०७ मोटार सायकल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना यश

उपसंपादक – रणजित मस्के
पालघर :- पालघर जिल्ह्यात मागील व चालु वर्षात वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. त्यातील आरोपीत निष्पन्न नव्हते. मोटार सायकल चोरीचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, यांनी श्री अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले. त्या अनुषंगाने श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पोउपनि / भरतेश हारुगीरे व स्थानिक गुन्हे शास्त्रेचे अमलदार यांचे पथक तयार करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या.

सदर पथकास गोपणीय माहीती मिळाली की गणेशनगर काटकरपाडा येथे राहणारा सन्यासी नायक हा वाणगाव, डहाणु, बोईसर परीसरातील मोटार सायकल चोरी करतो अशी माहीती मिळाली. मिळालेल्या बातमीच्या आधारे सदर संशयीत आरोपीचा शोध घेत असताना तो काटकरपाडा येथे मिळून आला. आरोपीत सन्यासी सुकन्या नायक वय ३३ वर्षे रा अवधनगर बोईसर मुळ रा. पांडीया ता रुस्तमपुर जि गंजाम राज्य ओडीसा यास ताब्यात घेवून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चित्रालय येथील आझाद अन्सारी याचे मदतीने वाणगाव, डहाणु, बोईसर येथून चोरी करून त्या मोटार सायकल त्याचे चित्रालय येथील आझाद गॅरेज मध्ये ठेवल्या असल्याचे सांगीतले. आरोपी आझाद अली अन्सारी वय २४ वर्षे धंदा मॅकेनिक, आझाद गॅरेज, रा. सरला – भवन जवळ काटकरपाडा, ता. जि. पालघर यास ताब्यात घेऊन त्याचे गॅरेजची झडती घेतली असता चोरीच्या एकुण ०७ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. सदर बाबत अज्ञात आरोपीत यांचे विरुदध वाणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. ४५/२०२३ भा.द.वि.स.कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
नमुद आरोपी यांचेकडुन वाणगाव, डहाणु, बोईसर परीसरातून अनेक मोटार सायकली चोरी करुन त्या भंगारात विक्री करण्याचा उददेश निष्पन्न झाल्याने अटक आरोपींकडून चोरी केलेल्या एकूण- १,७०,०००/- रुपये किंमतीच्या ०७ मोटार सायकल हस्तगत करुन जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकुण ०५ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून अन्य मोटार
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com