६८” व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सातारा पोलीसांचा श्वान “सुर्या” पहिल्यांदाच सुवर्णपदकाचा मानकरी …

सह संपादक- रणजित मस्के
सातारा :-झारखंड राज्यातील रांची येथे दिनांक १० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान झालेल्या ६८ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सातारा पोलीस बीडीडीएस पथकातील श्वान “सुर्या” याने एक्सप्लोझीव इव्हेंट मध्ये पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्र पोलीस व सातारा पोलीसांध्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

रांची येथील पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये देशातील २८ राज्य, स्पेशल फोर्सेस व केंद्रशासीत प्रदेश असे मिळून एकूण ४४ संघांनी सहभाग नोंदवला होता. एक्सप्लोझीव इव्हेंट विभागात लगेज सर्च, ग्राउंड सर्च, कार सर्च, फूड, रेप्यूजन आणि आज्ञाधारकपणा अशा प्रकारामध्ये ही स्पर्धा पार पाडली. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात श्वान “सुर्या” याने प्रथमच एक्सप्लोझीव विभागात सुवर्णपदक प्राप्त करून महाराष्ट्र पोलीस तसेच सातारा जिल्हा पोलीस दलाचे नाव भारत देशात उंचावले आहे. सातारा पोलीस दलाचा श्वान “सुर्या” हा अतिशय हुशार व कर्तव्य तत्पर आज्ञाधारक श्वान आहे. श्वान “सुर्या” याचे हॅन्डलर म्हणून पोलीस हवालदार निलेश दयाळ यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक गृह श्री. अतुल सबनीस आणि प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शेखर कडव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चोखपणे पार पाडलेली आहे.
या दैदिप्यमान कामगिरीबद्दल श्वान “सुर्या” व डॉग हॅन्डलर निलेश दयाळ, सेकंड हॅन्डलर सागर गोगावले यांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर व पोलीस उप अधीक्षक श्री. अतुल सबनीस यांनी विशेष सत्कार व कौतुक करून खास अभिनंदन केले आहे आणि भविष्यात सातारा जिल्हा पोलीस दलातील इतर श्वान अशाच प्रकारची चांगली कामगिरी करून सातारा जिल्हा पोलीस दलाचे नाव उंचवतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माननीय पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर व पोलीस उप अधीक्षक श्री. अतुल सबनीस, पोलीस उपनिरीक्षक शेखर कडव व बीडीडीएस पथकातील पोलीस जवान व इतर अधिकारी, अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com