६ लाखाची शस्त्र क्रीया महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने मार्फत मोफत ..
सह संपादक- रणजित मस्के
अहिल्यानगर :
दिनांक :- ३० जानेवारी २०२५
उत्कर्ष साळवे ( राहणार मु.पो.राशन, तालुका – कर्जत, जिल्हा – अहिल्या नगर) हा एक वर्षाचा मुलगा ह्याच्या छातीत गाठ असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. तसेच कळविले की शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास ६ लाखाचा खर्च येईल पण शस्त्रक्रिया यशस्वी होईलच याची गॅरंटी ९९% नाही.
अशी माहिती महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष (आरोग्य सेवा) श्री. प्रवीण भैलुमे यांना कळाली. लागलीच त्यांनी आपल्या संघटनेचे अध्यक्ष श्री. राहुल भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. किशोर जी वाजे यांच्याशी चर्चा करून सूत्रे हलवली आणि मुंबई येथील SRCC रुग्णालयात उत्तमरीत्या शस्त्रक्रिया मोफत करून घेतली.
आपल्या कार्याला मानाचा मुजरा…
धन्यवाद,
सुजित परशुराम जाधव
📞:- ९९३०२२०५८१
उप संघटक – पनवेल तालुका
महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना,महाराष्ट्र राज्य.
