४ महिन्यापासून फरार असलेल्या स्थानबध्द आरोपी आकाश नाईक उर्फ शिंदे यास हडपसर तपास पथकाने घेतले ताब्यात..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे

आकाश इरेशा नाईक ऊर्फ शिंदे वब २३ वर्ष रा. इंदिरानगर ०१ नंबर गल्ली, सुरक्षानगर हडपसर पुणे याचे विरूध्द खुनाचा प्रयत्न, गंभिर दुखापत, हत्यार बाळगणे असे ५ गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्यांमधून तो जामीनावर सुटले नंतर पुन्हा आपली गुन्हेगारी कृत्ये करीत असल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५५) (सुधारणा १९९६) (सुधारणा २००९) सुधारणा २०१५ चे कलम ३ प्रमाणे ०१ वर्षे स्थानबध्द करणेबाबत प्रस्ताव पाठविला असता मा. पोलीस आयुक्त, सो पुणे शहर यांचे कडील आदेशान्वये ०१ वर्षे स्थानबध्द करणेबाबत दिनांक २०.१२.२०२४ रोजी आदेशीत पारीत केला होता.
मा.श्री.डॉ. राजकुमार शिंदे साो. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व मा. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आणि निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या सुचनांप्रमाणे तपासपथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व तपास पथक अंमलदार हे काम करीत असताना, स्थानबध्द इसम हा वेळोवेळी त्याचे राहण्याचे ठिकाण बदलीत होता. तो कर्नाटक राज्य तसेच पुण्यात वेळोवेळी ठिकाणे बदलून राहत असल्याने मिळून येत नव्हता. तपासपथकास मिळालेल्या गोपनीय माहीती चे आधारे स्थानबध्द इसम आकाश इरेशा नाईक ऊर्फ शिंदे वय २३ वर्ष रा. इंदिरानगर ०१ नंबर गल्ली, सुरक्षानगर हडपसर पुणे यास ताब्यात घेतले आहे. आदेशाप्रमाणे त्याची कोल्हापूर कारागृह येथे रवानगी करीत आहोत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सारे पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री.डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव तुकाराम झुंजार, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, महेश चव्हाण, अमित साखरे, महाविर लोंढे, निलेश किरवे, बापु लोणकर, अजित मदने, कुंडलीक केसकर, अभिजीत राऊत, निगराणी पथकातील सहा. पोलीस फौजदार प्रविण शिदे, पोलीस अंमलदार शरद चव्हाण, प्रशांत दुधाळ, मनिषा जरांडे, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.