वाघोली पोलीसांनी लोणावळा भागातील एक वर्षापूर्वी बोलेरो पिकअप टेम्पो चोरी करणारा सराईत आरोपी घेतला ताब्यात…

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

लोणावळा :-दि.१९/०६/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली उपास पथक अधिकारी पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार प्रदिप मोटे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, समीर भोरडे, हे गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलींग करित असताना फिरत फिरत वाघेश्वर मंदिर, वाघोली पुणे येथे आलो असता पोलीस अंमलदार प्रदिप मोटे यांना त्याचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक अर्धवट नंबरप्लेट असलेली संशयित पांढरे रंगाची पिकअप गाडी ही वाघोली बाजारतळ येथे उभी आहे.

अशी बातमी मिळाल्याने आम्ही लागलीच सर्व स्टाफसह वाघोली बाजारतळ येथे गेलो असता तेथे अर्धवट नंबरप्लेट असेलेली पिकअप दिसुन आली. त्यामध्ये वाहन चालकाचे जागेवर एक इसम बसलेला मिळुन आला. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याच नाव सुनिल आण्णा कांबळे वय ४० वर्षे रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे. असे असल्याचे सांगीतले. त्यास पिकअप गाडीचे कागदपत्र व नंबर बाबत विधारणा करता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास पिकअप टेम्पो सह वाघोली पोलीस स्टेशन पुणे येथे आणले. त्यावेळी त्यास विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने सदरची पिकअप गाडी ही एक वर्षापुर्वी औढोली, मावळ, लोणावळा भागातुन एका घरासमोरुन चोरली असल्याचे सांगीतले. त्यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथील अभिलेख फोनव्दारे पडताळणी केली असता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.न.१२/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांना सदरचा आरोपी व बोलेरो पिकअप गाडी पुढील तपास कामी तब्यात देण्यात आली आहे.

सदरची कामगीरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ४. पुणे शहर श्री. हिम्मत जाधव मा. सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, सहा. पालीस उप-निरीक्षक रमेश साबळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, शिवाजी चव्हाण, समीर भोरडे, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी सालके, प्रितम वाघ, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट