मोरेवाडी मधील गावठी दारु तयार करणारे ०५ हातभ‌ट्टीवर छापा; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई…

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

कोल्हापूर :-कोल्हापुर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक साो, श्री. योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध दारु निर्मीती व विक्री करणारे व्यवसाईकांची माहिती काढून त्यांचेवर प्रभावी कारवाई करणे बाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत.

मा. वरिष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचेकरवी माहिती काढुन कारवाई करणेचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना माहिती मिळाली की, मोरेवाडी, ता.करवीर, जि. कोल्हापूर येथील कंजारभाट वसाहतीमध्ये पहाटेचे वेळी गावठी हातभ‌ट्टीची दारु तयार करतात. मिळाले माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे संतोष गळवे पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे पथकाने दि.२०.०६.२०२५ रोजी पहाटे ०५.०० वा जावुन मोरेवाडी, कंजारभाट वसाहत, मोरेवाडी या ठिकाणी गावठी हातभ‌ट्टीची दारु तयार करणा-या हात भट्टयावर ०५ ठिकाणी छापा टाकला. पथकाने जे सी बी च्या सहायाने सर्व गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या. सदर परिसरात ०५ ठिकाणी हातभ‌ट्टीची दारु तयार करणेकरीता वापरत असणारे ३८०० लिटर कच्चे रसायन, ५९०० लिटर पक्के रसायन, ३४० लिटर गावठी हातभ‌ट्टीची तयार दारु, ३४ पत्र्याची बॅरेल, दोन सिमेंट टाक्या, २९ प्लॅस्टिक पाईप, व दोन टन जळाऊ लाकुड असे एकूण ०५,२१,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच जेसीबीच्या सहायाने नाश केला आहे. सदरबाबत आरोपी १] रोहीत प्रकाश मांटुंगे रा कंजारभाट वसाहत मोरेवाडी ता करवीर जि कोल्हापूर, २] मनोज मोहन मिणेकर रा कंजारभाट वसाहत मोरेवाडी ता करवीर जि कोल्हापूर, ३] प्रकाश जॅक्सन बागडे रा. कंजारभाट वसाहत, मोरेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर ४] विजय जक्सन बागडे रा. कंजारभाट वसाहत, मोरेवाडी, ता.करवीर, जि. कोल्हापूर, ५] प्रमोद सुनिल बागडे रा. कंजारभाट वसाहत, मोरेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर असे एकुण पाच रेकॉर्डवरील सराईत आरोपीविरुध्द राजारामपुरी पोलीस ठाणेस महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत अधिक तपास राजारामपुरी पोलीस ठाणेचे अधिकारी करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक साो, श्री. योगेश कुमार, मा.अपर पोलीस अधीक्षक साो, निकेश खाटमोडे पाटील यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, संतोष गळवे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अमंलदार परशुराम गुजरे, गजानन गुरव, संतोष बरगे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, महेद्र कोरवी, विशाल खराडे, राजु कांबळे, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, अरविंद पाटील यांनी मिळुन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट