माणगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षकाने घालून दिला इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आदर्श..

प्रतिनिधी:-सचिन पवार

माणगांव रायगड
माणगाव:- माणगांव तालुक्यातील प्राथमिक शिक्षक दत्ताराम शिर्के यांनी आपला मुलगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकास कॉलनी या शाळेत इयत्ता पहिली मध्ये दाखल करून इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी आपलाही मुलगा किंवा मुलगी जिल्हा परिषदेमध्ये दाखल करून घ्यावी असा आदर्श आज घालून दिला.
श्री व सौ शिर्के ते दोघेही सरकारी नोकर असून आपलाही पाल्य आपल्या सरकारी शाळेत शिक्षण घेतलं पाहिजे या उदात्त हेतूने प्रेरित होउन त्यांचा चिरंजीव कुमार चित्रांश दत्ताराम शिर्के त्याला पहिली मध्ये दाखल केला आहे त्यांचा मोठा चिरंजीव कु.प्रबोध शिर्के असाच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून यावर्षी दहावी बोर्ड परीक्षेत 98.20 गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तरी इतर सरकारी कर्मचारी यांनी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलाला किंवा मुलीला सरकारी शाळेत दाखल करून जिल्हा परिषदेच्या शाळेतील घटणारी पट संख्या थांबवु शकतील हीच अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होताना दिसत आहे.