जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नवली फाटक ओव्हर ब्रिजच्या कामाची उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी केली पाहणी.

उपसंपादक -मंगेश उईके
पालघर


दि. 2 : DFCC व PWD च्या माध्यमातून चालू असलेल्या नवली फाटक येथील ओव्हर ब्रिजच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांना निवेदन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी तात्काळ DFCC आणि PWD च्या नवली फाटकाच्या ओव्हर ब्रिजच्या कामाला भेट देऊन पाहणी करून तेथील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी DFCC व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरीष्ठ अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदार व स्थानिक नागरीक उपस्थित होते.
सदर ओव्हर ब्रिजचे काम लवकर होण्याच्या दृष्टीकोनातून व नागरीकांना जाण्यायेण्याच्या अडचणींचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीकोनातून उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी DFCC व PWD यांच्या संबंधित कंत्राटदारांना सूचना दिल्या, व वेळेत काम करण्याचे नियोजन तात्काळ करावे, तसेच सद्यस्थित बंद असलेल्या रेल्वे फाटक क्र. 46 मुळे दक्षिणेकडील अंडरपासचा वापर करण्यात येत आहे. त्या अंडरपास मध्ये मोठया प्रमाणावर पाणी तूंबते त्याची पाहणी करुन त्याठीकाणी उंच्ची वाढवणे शक्य आहे किंवा कसे याची सुध्दा तपासणी उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी केली, तसेच त्या ठिकाणी रॉम्प करता येईल का याची तपासणी DFCC करुन सदर रॉम्प चे काम करावे अशी सुचना उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी केली.