जमिनीच्या वादातून जोडप्याला मारहाण व जातिवाचक शिवीगाळ …

उप संपादक – राकेश देशमुख
महाड : -८ जणांविरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंग व हाफ मर्डरचा गुन्हा दाखल…
रायगड जिल्ह्यामध्ये महाड शहरातील एम.जी. रोड येथील हॉटेल मेजवानी या हॉटेल किचनच्या जागेवरून जुना वादावरून एका जोडप्याला आठ जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करून जातिवाचक शब्दप्रयोग व अश्लील वर्तन करत आरोपी यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच संबंधित जोडप्याला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.

दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रसाद रामकृष्ण जाधव,पूजा प्रसाद जाधव,दर्शन प्रसाद जाधव, यश प्रसाद जाधव, रोशनी यश जाधव, निर्मला सावंत, साहिल सावंत, प्रवीण सावंत सर्व राहणार काकरतळे महाड यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंग व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आले आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.