गोंदी पो.स्टे. हद्दीतील ७ वाळूचोर अटकेत १ ट्रॅक्टरलोडर, ४ टॅक्ट्रर व १ बुलेट असा २२,००,०००/-₹ किमंतीचा मुददेमाल केला जप्त..
सह संपादक -रणजित मस्के
गोंदि
दिनांक 16/06/2025 रोजी पोलीस स्टेशन हददीत पोलीस सपोनी आशिष श्रीनिवास खांडेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक बालाजी पद्मणे, पो. हवा. केंद्रे, पो. हवा. हजारें, पो कॉ. सिद्दीकी, पो कॉ भोजने, पो. कॉ. हवाळे, पो कॉ. शेख, पो. कॉ. काळे यांनी गंगा चिंचोली शिवारात गोदावरी नदी पात्रात काही इसम हे टैक्ट्रर लोडरच्या साहयाने अवैध वाळुचे उत्खनन करुन चोरटी वाहतुक करत आहेत असे समजल्याने दोन पंचासमक्ष बातमीतील नमुद ठिकाणी खात्री करण्यासाठी जात असताना गंगा चिंचोली गाव शिवारात कच्या रस्त्याने सहा ट्रॅक्टर व एक ट्रॅक्टर लोडर असे पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना त्यांचा पाठलाग करुन एक ट्रॅकर लोडर पकडले व बाकीचे ट्रॅक्टर पळून गेले त्यामुळे पंचासमक्ष ट्रॅक्टर लोडर जप्त करुन गोंदी पोलीस स्टेशन येथे लावले व अवैध वाळु उत्खनन व वाहतुक करणारे आरोपी विरुध्द गोंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. 225/2025
1/6
कलम 303(2), 3(5) भारतीय न्यायसंहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला. तसेच शहागड गाव शिवारात गोदा नदी पत्रात काही लोक केणीच्या मदतीने वाळू काढत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस त्या ठिकाणे गेले असता वाळू चोरांना पोलिसांची चाहूल लागताच ट्रॅक्टर केणीसाह पळून गेले. गुप्त बातमीदारा मार्फत 03 वाळू चोरांचे नाव निष्पन्न केले व घटनास्थळी एक बुलेट गाडी मिळून आल्याने जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकारा बाबत गोंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. 223/2025 कलम 303(2), 3(5) भारतीय न्यायसंहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवाई मध्ये एकुण 22,00,000/-₹ किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही गुन्हयाचे तपासात आरोपी 1. युवराज दिगंबर गुळवणे 2. द्वारकादास भीमराव गुळवणे 3. कृष्णा निवृत्ती धाये 4. कृष्णा गंगाधर शिंदे सर्व रा. कोठाळा खुर्द ता. अंबड 5. संजय सुभाष उंबरे, 6. गणेश शांतीलाल उंबरे, 7. आकाश मधुकर येटाळे तिघे रा. शहागड ता. अंबड हे मिळून आल्याने त्यांना गुन्हयात अटक केलेल्या असून आरोपी हे पोलीस कोठडीत असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
दोन्ही कारवाया ह्या मा. पोलीस अधिक्षक श्री अजय कुमार बन्सल सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री आयुष नोपाणी सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे सो., सहा. पोलीस निरीक्षक श्री आशिष खांडेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक बालाजी पद्मणे व पो. हवा. रामदास केंद्रे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.