खंडणीखोर पत्रकाराला खोपोली पोलीसांनी सापळा रचून त्याच्या साथीदारासह केले जेरबंद…

0
Spread the love

खोपोली

सह संपादक -रणजित मस्के

खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील एक स्थानिक पत्रकार किशोर साळुंके हा गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक बांधकाम व्यावसाईक, व्यापारी, दुकानदार, विविध सामाजीक सेवाभावी संस्था यांना अनधिकृत शासकिय कामे व बांधकामे याबाबत वेगवेगळ्या व्हॉटस्अप ग्रुपवर व स्थानिक पत्रके काढून कायदेशिर कारवाई करण्याबाबत धमकावत होता. तो “साप्ताहिक जागरुक रायगड” चा पत्रकार असून एका राजकिय पक्षाचा पदाधिकारी देखील असल्याचे तो सांगत असे.

अशाच प्रकारे खोपोली शहरातील ज्वेलर्स व बांधकाम व्यावसाईक श्री. निरज प्रकाश ओसवाल यांनाही त्यांच्या “एमार्क स्क्वेअर” या इमारतीच्या बांधकामाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या माध्यमातून धमकावत होता व इमारतीचे बांधकाम विनाअडथळा सुरु ठेवण्याकरिता त्यांच्याकडे 5,00,000/- रुपये इतक्या रक्कमेच्या खंडणीची मागणी केली होती. श्री.निरज ओसवाल यांनी दिनांक 16.06.2025 रोजी त्यास 25,000/- रुपये रोख रक्कम दिली होती व आणखी 1,50,000/- रुपयांची किशोर साळुंके याने त्यांच्याकडे मागणी केली होती. त्याबाबत श्री.निरज ओसवाल यांनी खोपोली पोलीस ठाणे येथे तक्रार केली होती. त्यानंतर श्री. शितल राऊत, पोलीस निरीक्षक खोपोली पोलीस ठाणे यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन दोन पोलीस पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फतीने अत्यंत चलाखीने सापळा लावला आणि दिनांक 17.06.2025 रोजी 20:45 वा. चे सुमारास किशोर सिद्राम साळुंके यास 1,50,000/- रुपये खंडणीची रक्कम स्विकारतांना त्याचा साथीदार मध्यस्थ किशोर कपूरचंद पोरवाल याच्यासह खोपोली बाजार पेठेतील जैन मंदिराच्या शेजारी असणा-या हॉटेल रामदेव येथे रंगेहात ताब्यात घेतले. त्या दोघांच्या विरुध्द खोपोली पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं.148/2025, बी.एन.एस. कलम 308(1),308(2) सह 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

सदरची कारवाई ही मा.श्रीमती आँचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड, मा.श्री. अभिजीत शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड व मा. श्री. विक्रम कदम, उप विभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत, सपोनि. श्री. मनोज ठाकरे, पोउनि. श्री. अभिजीत व्हरांबळे व त्यांच्या पथकाने केली आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन कोणत्याही लाभाची मागणी केली असल्यास त्याबाबत नागरिकांनी खोपोली पोलीस ठाणे येथे संपर्क करुन तक्रार दाखल करावी असे आवाहन सर्व नागरिकांना यावेळी पोलीसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट